Salman Khan and Kumud Rane : सलमान खान याची मैत्रिण कुमुद राणे हिचं निधन झालं आहे. सलमान खान हिला आपल्या मैत्रिणीच्या निधनानं मोठं दु:ख झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये सलमान खान भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंत्यसंस्काराला आलेला सलमान खानचे अश्रू अनावर झाल्याचं समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान खानचं संपूर्ण कुटुंब अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
सलमानने जवळच्या मैत्रिणीला गमावलं...
सलमान खानने आपल्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला गमावलं आहे. वृत्तांनुसार, कुमुद राणे आणि खान कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध होते. कुमुदच्या निधनाचं वृत्त कळताच सलमान खान तिथं पोहोचला. सलमान खानकडून तिची आई सलमा खान, अभिनेत्री हेलेन, अरबाज खान, सोहेल खान अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या निधनाने सलमान खानला खूप दुःख झालं आहे. तो कुमुदच्या आई-वडिलांशी, कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोलताना दिसत आहे. या दुःखाच्या काळात भाईजान त्याच्यासाठी आधारस्तंभ होता. अंत्यविधीदरम्यान सलमानच्या डोळ्यांतील अश्रू पाहून चाहतेही भावुक झाले आणि त्याला खंबीर राहण्याचं आवाहन करत भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
कुमुद राणे हिचं निधन कसं झालं याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. कुमुद राणे ही २००५ मध्ये स्थापन झालेलं लग्जरी ब्यूटी लाऊंज आणि सलून 'रेन ब्यूटी बार'ची मालकीण होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world