जाहिरात

आई, मुलगा अन् सुनामी..कसा आहे Netflix चा नवा चित्रपट 'द ग्रेट फ्लड'? Movie Review वाचल्यावर धुरंधर विसराल

 नेटफ्लिक्सवर नवा कोरियन चित्रपट ‘द ग्रेट फ्लड’ 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शीत करण्यात आला आहे. किम ब्युंग-वू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काय पाहाल? वाचा रिव्हूय..

आई, मुलगा अन् सुनामी..कसा आहे Netflix चा नवा चित्रपट 'द ग्रेट फ्लड'? Movie Review वाचल्यावर धुरंधर विसराल
The Great Flood Movie Review

The Great Flood Netflix Review : नेटफ्लिक्सवर नवा कोरियन चित्रपट ‘द ग्रेट फ्लड' 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शीत करण्यात आला आहे. किम ब्युंग-वू यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट (डिझास्टर-सायन्स-फिक्शन)वर आधारित आहे. हा चित्रपट सुरुवातीला हृदयाची धडधड वाढवतं. पण काही वेळानंतर या चित्रपटाचा सस्पेन्स अधिक वाढतो. या चित्रपटाची स्टोरी सियोलमधील एका भयंकर पुरापासून सुरु होते. अभिनेत्री किम दा-मी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत.

चित्रपटात तुम्ही पाहू शकता की, ही अभिनेत्री एका छोड्या इमारतीत अडकते. त्याचदरम्यान पुराचे पाणी वेगाने वर येतं आणि ती तिच्या 6 वर्षांच्या मुलाला,जा-इन (क्वोन ईउन-सेओंग) वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावते. चित्रपटात पहिले 40-45 मिनिटे श्वास रोखून धरणारे सीन्स आहेत. पाण्याचा आवाज, इमारती कोसळणे,लोकांचा आरडाओरडा,हे सगळं इतके खरं वाटते की,जणूकाही तुमच्या आजूबाजूलाच पूराचं पाणी आलं आहे.  

नक्की वाचा >> Kangana Ranaut: खरा 'धुरंधर' कोण? Dhurandhar पाहिल्यानंतर कंगणा रणौत भडकली, 2 शब्दातच सांगितलं

चित्रपटात आहे एक मोठा सस्पेन्स

त्यानंतर या चित्रपटात एक मोठा ट्वीस्ट येतो,जो या स्टोरीमधील सर्वात मोठा सस्पेन्स आहे.किम दा ही एक एआय संशोधक आहे, जी मानवतेच्या भावना तपासण्यासाठी हे सिम्युलेशन चालवत आहे.तिचा मुलगा प्रत्यक्षात खरा मुलगा नसून एक एआय प्रोजेक्ट आहे. संपूर्ण पूर हा एका लूपमध्ये वारंवार चालतो,जेणेकरून एआयला खरी भावना, विशेषतः आईचे प्रेम आणि भीती शिकवता येईल, या सर्व गोष्टी तुम्हाला या चित्रपटात पाहता येतील. 

 किम दा-मीने अप्रतिम अभिनय केला आहे. ती आईसारखी रडते,लढते आणि ट्वीस्टनंतर जेव्हा तिचे पात्र संपतं,तेव्हा खूप भावनिक अनुभव येतो. 
 क्वोन ईउन-सेओंगच्या निरागसतेनं अनेकांचं मन जिंकलंय. पण तो खार नाही, हे जेव्हा कळतं,तेव्हा एक मन सुन्न झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटातील 
व्हिज्युअल इफेक्ट्स अप्रतिम आहेत.पुराचे सीन इतके खरे वाटतात की घरातच पाणी शिरल्यासारखा भास होतो.

नक्की वाचा >> Shocking News : पाकिस्तान नाही, आता 'या' मुस्लिम देशात सतत गायब होतायत हिंदू, कारण जाणून हादराच बसेल 

डिजास्टर, दुसऱ्या भागात साय-फाय टाइम लूप अन् शेवटी..

पहिल्या भागात डिजास्टर, दुसऱ्या भागात साय-फाय टाइम लूप आणि शेवटी इमोशनल एआय ड्रामा याचं एकत्रित सादरीकरणं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही ठिकाणी याचा फ्लो तुटतो.एकूणच हा चित्रपट त्या लोकांसाठी आहे ज्यांना डिजास्टर आणि सायन्स-फिक्शनचं मिश्रण आवडतं. पहिले 40 मिनिटे जबरदस्त आहेत, पण नंतरचा भाग थोडा गोंधळात टाकणारा आणि लांबट वाटतो. हाच या चित्रपटाचा निगेटिव्ह पॉईंट आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com