Ranveer Allahbadia: लोकप्रिय यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दिवाळी 2025 च्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या, ज्यात त्याने वापरलेल्या एआय (AI) फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोंमुळे रणवीरने त्याचे रिलेशनशिप ऑफिशियल केल्याचे मानले जात आहे. त्याचे नाव जुही भट्टसोबत जोडले जात आहे.
या चर्चांमध्ये आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंड निक्की शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पोस्टमुळे रणवीरचे 'गुपित' उघड झाल्याचा दावा केला जात आहे.
निक्की शर्माने उघड केले 'डर्टी सीक्रेट'?
रणवीर अलाहाबादियाने एआय इमेज शेअर करताच, त्याची एक्स गर्लफ्रेंड निक्की शर्मा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये रणवीरच्या कथित 'डर्टी सीक्रेट'चा खुलासा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

Ranveer Allahbadia
निक्की शर्माने शेअर केलेल्या चॅट स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले आहे की, 'मी पूर्णपणे हादरले आहे, नेहमी फक्त दिखावा करायचा. तो काही महिन्यांसाठी चांगला राहील आणि मग म्हणेल, मी ट्रॉमामध्ये आहे. मी लग्न आणि मुले करू शकत नाही.'
निक्कीने ही पोस्ट रणवीरने त्याचे नवीन रिलेशनशिप कन्फर्म केल्याच्या काही वेळातच शेअर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, निक्कीने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही, तरीही सोशल मीडियावरील युजर्स ही पोस्ट थेट रणवीर अलाहाबादियाशी जोडत आहेत.
रणवीर अलाहाबादियाने रिलेशनशिप केले कन्फर्म?
रणवीर अलाहाबादियाने दिवाळीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. यात त्यांनी काही फोटो आणि सोबतच काही एआयद्वारे तयार केलेले कपल फोटो शेअर केले होते. या एआय फोटोमध्ये जुही भट्ट आणि रणवीर असल्याचे बोलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world