धनश्री-युजवेंद्रचा घटस्फोट 'या' व्यक्तीमुळे होतोय? तो फोटो व्हायरल झाल्याने झाला होता वाद 

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal Divorce: युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान त्याची पत्नी धनश्री वर्माचे नाव एका व्यक्तीसोबत जोडले जात आहे. कोण आहे तो व्यक्ती? त्याच्यासोबतचा धनश्रीचा तो फोटो व्हायरल झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal Divorce: शिखर धवन, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्यानंतर आता टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहलचाही संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसतंय. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यादरम्यान धनश्रीला लोक वाईटरित्या ट्रोलही करत आहेत. यावर धनश्रीने मौन सोडत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डान्स रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये धनश्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळेसही धनश्रीला नेटकऱ्यांनी टार्गेट केले होते. 'गोल्ड डिगर', 'पैशांसाठी लग्न करणारी मुलगी' असे म्हणत धनश्रीला लक्ष्य केले गेले. धनश्रीचा एका व्यक्तीसोबत व्हायरल झालेल्या फोटोवरून हा सर्व गोंधळ सुरू झाला होता. नेमका कोण होता तो व्यक्ती आणि काय आहे प्रकरण? जाणून घेऊया... 

(नक्की वाचा: Dhanashree Verma : "माझे मौन दुर्बलतेचे लक्षण नाही...', धनश्री वर्माचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर)

धनश्रीचे नाव कोणासोबत जोडले गेले होते?

धनश्री अभिनेत्री तसेच उत्तम डान्सर देखील आहे. तसेच ती एक डेंटिस्ट देखील आहे. धनश्री सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि ती एकापेक्षा एक कमाल डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअरही करते. सध्या पती युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चामुळे ती चर्चेत आहे. दरम्यान यामागे धनश्रीचा एक जुना फोटो कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रतीक उटेकर आणि धनश्रीचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरून धनश्रीसह चहललाही ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान लोक जसा विचार करत आहेत, तसे धनश्री आणि आपल्यामध्ये असे कोणतेही नाते नसल्याचे प्रतीकने स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. 

(नक्की वाचा: Yuzvendra Chahal च्या मनात काय सुरु आहे? घटस्फोटाच्या चर्चेत नव्या पोस्टचा अर्थ काय?)

कोण आहे प्रतीक उटेकर?

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धनश्री आणि प्रतीक एकमेकांच्या अतिशय जवळ दिसत होते. प्रतीकबाबत सांगायचे झाले तर तो मुंबईतील रहिवासी आहे आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रतीकने त्याची ओळख निर्माण केली आहे. आज तो छोट्या पडद्यावरील स्टार डान्सर-कोरिओग्राफर आहे. प्रतीकने बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील कित्येक स्टार्ससाठी कोरिओग्राफी केलीय.  माधुरी दीक्षित, सलमान खान, प्रियंका चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींसाठी त्याने काम केलंय.  

Advertisement
Topics mentioned in this article