सिगारेट ओढायचे बॉलिवूड अभिनेत्रीला होते व्यसन, एका आनंदाच्या बातमीमुळे कायमची सुटली सवय

बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत जिला धूम्रपान करण्याची सवय लागली होती. दिवसाला अनेक सिगारेट ओढणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या एका बातमीमुळे तिने हे व्यसन कायमचे सोडून दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bollywood News: सिगारेट ओढणे हे अत्यंत वाईट व्यसन आहे. यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे जीवही जाऊ शकतो. हे माहिती असूनही अनेकजण सिगारेट ओढतात. काहींसाठी हे स्टाइल स्टेटमेंट असते तर काहींसाठी सिगारेट पिणे ही आवड असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना धूम्रपानाची सवय असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी दिवसाला मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढायची. मात्र आयुष्यात आलेल्या एका आनंदी क्षणामुळे तिने हे व्यसन कायमचे सोडून दिले. 

(नक्की वाचा: हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा)

झीनत अमान ही 80च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होत्या. बिग बी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासह तिने बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांसह काम केले आहे. झीनत या खासगी आयुष्यात अत्यंत स्टायलिश होत्या. त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन होते आणि त्या पार्ट्यांमध्ये खुलेआम सिगारेट ओढताना दिसायच्या. पण एका आनंदाच्या क्षणामुळे त्यांचे हे व्यसन सुटले. ही बाब स्वत: त्यांनीच सांगितली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी आपल्या या व्यसनाबद्दल आणि व्यसनातून मुक्त होण्यासाठीच्या कारणाबाबत सांगितले आहे.    

(नक्की वाचा: सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?)

झीनत अमान यांना इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत दिग्दर्शक जॉय मुखर्जी आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया दिसत आहेत. या फोटोमध्ये झीनत सिगारेट ओढताना दिसत आहेत. झीनत हा फोटो शेअर करताना आठवणीमध्ये रमल्या होत्या. त्यांनी डिंपल कपाडिया यांचंही तोंडभरून कौतुक या पोस्टमध्ये केले आहे. या पोस्टच्या अखेरीस झीनत यांनी सिगारेटच्या व्यसनाबद्दलही लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कृपया हा फोटो पाहून माझ्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे प्रभावित होऊ नका. कबूल करते की तरुणपणी मी सिगारेट ओढायचे. मात्र जेव्हा मी पहिल्यांदा गर्भवती राहिले होते तेव्हापासून हे व्यसन सोडून दिले. "

Advertisement

झीनत यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

(नक्की वाचा: सिनेमाचे बजेट 11 कोटी, कमाई झाली पाचपट आणि इंडस्ट्रीला मिळाले 3 सुपरस्टार)

VIDEO: Ghatkopar Hoarding दुर्घटनेसारखी घटना घडल्यास इंश्युरन्स क्लेम करता येतो का? A टू Z माहिती

Topics mentioned in this article