आमीर खान, रणबीर कपूरसारख्या सेलिब्रिटींची या कंपनीत गुंतवणूक, तुम्हीही वापरले असतील कंपनीचे प्रॉडक्ट

Xolopak इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या प्री IPO राऊंडमधून जवळपास 34.5 कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीची लिस्टिंग ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

बॉलिवूड सेलिब्रिटींबाबत सगळ्यांना नेहमीच आकर्षण असतं. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील अनेकांना उत्सुकता असते. सेलिब्रिटींबद्दलची अशीच एक माहिती समोर आली आहे. आमीर खान, रणबीर कपूर, करण जोहर सारख्या बड्या सेलिब्रिटींनी Xolopak इंडिया लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली आहे. दिग्गज गुंतवणूकदार आणि रोजी ब्लू इंडियाचे मालक रसेल मेहता यांनी या कंपनीत मायनॉरिटी हिस्सा खरेदी केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रिवरस्टोन कॅपिटलचे देवनाथन गोविंदराजन, रवी नाथन अय्यर, ज्योती केतन वखारिया आणि जयरामन विश्वनाथन यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही Xolopak इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या प्री IPO राऊंडमधून जवळपास 34.5 कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीची लिस्टिंग ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. 

पुण्यातील या कंपनीने काही महिन्यांपूर्वीच NSE वर आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट (DRHP) केलं आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, ऑफरमध्ये 10 रुपये प्रति शेअरची फेस व्हॅल्यूवर 52,86,000 शेअर्सचा फ्रेश इश्यूचा समावेश आहे. 

(नक्की वाचा- Wikipedia भारतामध्ये बंद होणार? हायकोर्टानं दिला थेट इशारा, प्रकरण काय?)

कंपनी काय करते?

Xolopak इंडिया वुडन कटलरीची उत्पादक कंपनी आहे. यामध्ये आयस्क्रिम स्टिक, चमचे यांचा समावेश आहे. याशिवाय फोर्क्स, चाकू, कॉफी स्टिरर्स आणि चॉपस्टिक देखील कंपनीत बनवले जातात. कंपनी मुख्यत: बिझनेस टू बिझनेसमध्ये काम करते. 

Advertisement

( नक्की वाचा : Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं )

कंपनीची आर्थिक स्थिती?

अमूल आणि मदर डेअरी कंपनीचे मोठे ग्राहक आहेत. शशांक मिश्रा आणि बननी चॅटर्जी कंपनीने प्रमोटर्स आहेत. या क्षेत्रात त्यांचा 17 वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचं महसूल तिप्पट वाढून 31.47 कोटींवर पोहोचलं आहे. मागील वर्षी कंपनीचा महसून 11.87 कोटी होता. कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.36 कोटींचा नफा झाला होता. 

Topics mentioned in this article