अदाणी विल्मार लिमिटेडमधून बाहेर पडणार असल्याची घोषणा अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडनं (AEL) सोमवारी केली. कंपनीनं या समुहातील आपल्या सर्व 44 टक्के समभागांची विक्री करणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा सर्व व्यवहार साधारण 200 कोटी डॉलरमध्ये होणार आहे.
कंपनीनं याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. त्यानुसार अदाणी एंटरप्रायझेझ, विल्मर इंटरनॅशनलला 31.06 टक्के हिस्सा विकणार आहे. त्याचबरोबर अदाणी एंटरप्रायझेस विक्रीच्या ऑफरद्वारे किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग आवश्यकतांचे पालन करण्यासाठी अदाणी विल्मारमधील 13% शेअर्सची विक्री करेल.
याचा अर्थ अदाणी एंटरप्रपायझेस अदाणी विल्मर लिमिटेडमधील सर्व 44 टक्के समभागाची विक्री करणार असून या कंपनीतून बाहेर पडणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे करार?
अदाणी एंटरप्राझेस, अदाणी कमोडिटीज (ACL) ची उपकंपनी आणि लेन्स प्रायव्हेट लिमिटेड, विल्मार इंटरनॅशनलची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी यांच्यात एक करार केला आहे. त्या करारानुसार लेन्स ACL कडे असलेल्या समभागांसह अदाणी विल्मारचे सर्व पेड अप इक्विटी शेअर्स विकत घेणार आहे.
अदाणी एंटरप्रायझेस, उपकंपनी अदाणी कमोडिटीज (ACL) आणि लेन्स, विल्मर इंटरनॅशनल (AWL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, यांच्यामधील करारानुसार लेन्स कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शनच्या वापराच्या तारखेनुसार ACL कडे असलेले अदाणी विल्मरचे शेअर्स AWL च्या विद्यमान पेड अप इक्विटी कॅपिटलच्या कमाल 31.06% च्या संदर्भात विकत घेईल.
( नक्की वाचा : Adani Enterprises ला 'बाय' रेटींग, वेंचुरा सिक्युरेटीजनं दिला सल्ला )
किती रुपयांना होणार शेअर्सची विक्री?
अदाणी आणि विल्मार शेअर्सची विक्री आणि खरेदीला गती देण्यासाठी पर्यायी पद्धतींचा शोध आणि मूल्यमापन करतील, हे सर्व व्यवहार संबंधित कायद्यांचं पालन करुन करण्यात येणार आहेत. दोन्ही पक्षांनी परस्पर मान्य केलेल्या किंमतीवर या शेअर्सची विक्री करण्यात येईल, असं या फाईलिंगमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात प्रती शेअर्सची किंमत 305 रुपयांपेक्षा जास्त नसेल, असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत, BSE वरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अदाणी कमोडिटीज (ACL) आणि Lence यांच्याकडे 43.94% हिस्सा होता.
त्याचबरोबर अदाणींतर्फे नियुक्त करण्यात आलेले संचालक प्रणव अदाणी आणि मलय महादेविया हे अदाणी विल्मारच्या संचालक मंडळातून बाहेर पडणार आहेत. अदाणी बाहेर पडल्यानंतर या कंपनीचे नाव बदलण्यासाठी पावलं उचलली जातील.
सोमवारी (30 डिसेंबर) बाजार बंद होण्यापूर्वी याबबातची बातमी जाहीर करण्यात आली. अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स सोमवारी 7.57 टक्क्यांनी वधारले. ते सोमवारी 2,592.35 रुपयांवर बंद झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world