जाहिरात

Adani Enterprises ला 'बाय' रेटींग, वेंचुरा सिक्युरेटीजनं दिला सल्ला

Adani Enterprises: गेल्या काही दिवसांमधील सर्व आव्हांना न जुमानता अदाणी समूह अतिशय मजबूतपणे वाटचाल करत आहे.

Adani Enterprises ला 'बाय' रेटींग, वेंचुरा सिक्युरेटीजनं दिला सल्ला
मुंबई:

गेल्या काही दिवसांमधील सर्व आव्हांना न जुमानता अदाणी समूह अतिशय मजबूतपणे वाटचाल करत आहे. प्रमुख ब्रोकरेज कंपनी वेंचुरा सिक्योरिटीज लिमिटेडनं याबाबत केलेल्या भाकितावरुन हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.  

वेंचुराने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला (AEL) 'बाय' रेटिंग दिले आहे. तर 57.8% च्या वाढीसह, लक्ष्य किंमत रुपये 3801/शेअर ठेवण्यात आली आहे. बुल केससाठी (जास्तीत जास्त तेजी), पुढील 2 वर्षांसाठी लक्ष्य किंमत रुपये 5,748/शेअर ठेवण्यात आली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 139% जास्त आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

  • Ventura च्या मतानुसार, AEL ने अस्थिरता असूनही आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये  मजबूत मूलभूत तत्त्वे आणि ऑपरेशनल क्षमता दाखवली आहे.
  • विमानतळ आणि सोलर व्यवसायात जोरदार वाढ दिसून आली आहे. तसेच, तांबे व्यवसायातील चांगल्या उत्पन्नामुळे एईएलच्या नफ्यात सुधारणा अपेक्षित आहे, त्यामुळे कंपनीची आर्थिक कामगिरी देखील सुधारेल.
  • व्हेंचुराच्या मतानुसार कंपनीच्या शेअरच्या किमतीतील अलीकडील अस्थिरतेमुळे स्टॉक बीटामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

( नक्की वाचा : Adani Group : शानदार...जबरदस्त...जिंदाबाद! अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी सुसाट )

Ventura चा अंदाज
 

  • AEL च्या FY24-27E मधील एकत्रित महसुलात 17.5% CAGR, EBITDA मध्ये 37.5% CAGR आणि निव्वळ कमाईमध्ये 45.8% CAGR वाढण्याचा अंदाज आहे.
  • आर्थिक वर्ष 2027 पर्यंत AEL चा महसूल रु. 1,56,343 कोटी, EBITDA रु. 28,563 कोटी आणि निव्वळ कमाई रु. 9,245 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
  • RoE मध्ये 563 बेसिस पॉइंट्स आणि RoIC मध्ये 99 बेसिस पॉइंट्सची अंदाजे वाढ. RoE 14.5% आणि RoIC 11.3% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: