अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडने भारताच्या हरित क्रांतीच्या प्रवासात एक मोठं यश मिळवलं आहे. कंपनीने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी 15,539.9 मेगावॅट रिन्यूएबल किंवा अक्षय ऊर्जा मिळवली आहे.
या यशाबाबत स्वत: अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी एक्सवर माहिती दिली आहे. यावेळी गौतम अदाणी म्हणाले, अदाणी हरित ऊर्जा प्रकल्प आता 15,000 मेगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जेच्या क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान अदाणी हरित विस्तार आहे.
त्यांनी एक्सवर लिहिलंय, हा केवळ एक आकडा नाही. तर भारताच्या हरित अक्षय ऊर्जेच्या दिशेने आमचा मजबूत संकल्प आहे. खवडाच्या वाळवंटी जमिनीपासून जगातील टॉप १० हरित ऊर्जा निर्मितीच्या यादीत सामील होणं, आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी पुढे लिहिलंय, माइलस्टोन पर्यावरणासाठी आमची जबाबदारी आणि भारताला हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे घेऊन जाणं आमची दृष्टी दर्शवते.
15 महिन्यात 5,000 मेगावॅटहून अधिक क्षमता वाढवण्याचा विक्रम
कंपनीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, अदाणी ग्रीन एनर्जीने अवघ्या 15 महिन्यांत 10,000 मेगावॅटवरून 15,500 मेगावॅटपर्यंत झेप घेतली आहे. कंपनीने ही वाढ भारतातील आतापर्यंतच्या सर्वात वेगवान ग्रीन एनर्जी विस्तार प्रकल्पातील मानला जात आहे.
नक्की वाचा - Gautam Adani News: 'भारत शांतताप्रिय, पण कुणी डोळे दाखवाल तर...', गौतम अदाणींचे ऑपरेशन सिंदूरवर भाष्य
खवडामध्ये कंपनीकडून जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्लांट...
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खवडामध्ये कंपनी जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्लांट तयार करीत आहे. ज्याची क्षमता 30,000 मेगावॉट असते. हा प्लांट 538 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. हा प्लांट पॅरीस शहरापेक्षा पाच पटीने मोठा आहे. येथून आतापर्यंत 5,355.9 मेगावॅट क्षमतेटी वीज निर्मिती करण्यात आली आहे.
हा प्लांट पूर्ण झाल्यानंतर केवळ ग्रीन एनर्जीमध्येच नाही तर सर्व प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांमध्ये जगातील सर्वात मोठा पॉवर प्रकल्प तयार केला जाईल.
2030 पर्यंत 50,000 मेगावॅटचं लक्ष्य...
कंपनीचे सीईओ आशिष खन्ना माइलस्टोवर म्हणाले, हे यश अदाणी ग्रीनच्या टीमला समर्पित आहे. ते पुढे म्हणाले, गौतम अदाणी यांच्या विचारांनुसार कंपनी संपूर्ण जगात ग्रीन एनर्जीसाठी आघाडीवर होण्याच्या दिशेने काम करीत आहे. त्याचं पुढचं लक्ष्य 2023 पर्यंत 50,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा पोहोचवणं आहे.
अदाणी ग्रीनचा ऑपरेशनल पोर्टफोलिओ सुमारे ७.९ दशलक्ष घरांना वीज पुरवण्यास सक्षम आहे. ही ऊर्जा भारतातील १३ राज्यांना प्रकाश देऊ शकते. विशेष म्हणजे कंपनीची संपूर्ण ऊर्जा उत्पादन प्रणाली वॉटर पॉझिटिव्ह, सिंगल यूज प्लास्टिक फ्री आणि शून्य कचरा ते लँडफिल प्रमाणित आहे.