जाहिरात
This Article is From Feb 17, 2025

Adani Group: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 शाळा उघडण्यासाठी अदाणी समूह देणार 2000 कोटी, वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

या शाळांमध्ये 30 टक्के जागा या दारिद्र रेषेखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहेत.

Adani Group: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 शाळा उघडण्यासाठी अदाणी समूह देणार 2000 कोटी, वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
नवी दिल्ली:

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा देशभरात बनाव्यात. त्या शाळांमध्ये सर्व सामान्य मुलांना मोफत शिकता यावे या उद्देशाने अदाणी समूहाने 2000 कोटीची मदत देण्याची घोषणा केली आहे. या रक्कमेतून देशभरात 20 शाळा नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारल्या जाणार आहेत. जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर हा करार करण्यात आला आहे. या शाळांमध्ये 30  टक्के जागा या दारिद्र रेषेखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आपला छोटा मुलगा जीत अदाणी यांच्या लग्ना वेळी सामाजिक कार्यासाठी 10,000 कोटी दान करण्याची घोषणा केली होती. त्यातील 6  हजार कोटी हे रुग्णालयांसाठी तर 2 हजार कोटी हे कौशल्य विकासासाठी देण्याचे  जाहीर केले. त्यानंतर 2 हजार कोटी हे आता नव्या शाळांच्या निर्माणासाठी दिले जाणार आहेत. याबाबतचा करार जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर सोमवारी करण्यात आला. 

ट्रेंडिंग बातमी - गौतम अदाणी यांनी तारापूर अणूकेंद्राला दिली भेट! अणू ऊर्जा क्षेत्राची घेतली माहिती

याबाबत अदाणी समूहाच्या अदाणी फाऊंडेशनने माहिती दिली आहे. देशभरात शिक्षणाची मंदिरं उभी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातली अग्रगण्य असलेल्यी जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर आम्ही सहकार्य करणार आहोत. यासाठी अदाणी परिवार मार्फत दोन हजार कोटीचे सुरूवातीचे योगदान देण्यात आले आहे. समाजातील सर्व वर्गातील लोकांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळाव्यात ही प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं आहे. अदाणी फाऊंडेशन देशातील 19 राज्यातील 6 हजार 769 गावात काम करत आहे. 

जीत अदाणी आणि दिवा शाह यांचा विवाह 7 फेब्रुवारीला अहमदाबाद मध्ये पार पडला होता. या विवाह सोहळ्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी सामाजिक कार्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची महादान घोषित केले होते. गौतम अदाणी सांगतात, 'सेवा साधना आहे, सेवा प्रार्थना आहे आणि सेवा हिच परमात्मा आहे' यानुसार त्यांनी दान केलेला मोठा हिस्सा हा आरोग्य,  शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी दिला गेला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com