
अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तारापूर अणूऊर्जा केंद्राला (TMS) भेट दिली. अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि तेथील कामकाजाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तारापूर अणुऊर्जा केंद्राने (TAPS) ही माहिती दिली. TMS मध्ये दोन अणुऊर्जा केंद्र आहेत.
या शिष्टमंडळात अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन आणि ऊर्जा रणनिती विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. तारापूर अणूऊर्जा केंद्र (TAPS) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि साईट व्यवस्थापनाने अदाणी समूहाच्या अधिकाऱ्यांना भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाची माहिती दिली.
अदाणी समुहाच्या अधिकाऱ्यांनी TAPS 3 आणि 4 प्लांट क्षेत्राचा दौरा केला. त्यावेळी त्यांना प्लांटच्या कामकाजाचा तपशीलवार आढावा देण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळाला तज्ज्ञांनी तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या बाबी, सुरक्षा उपाय आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणातील अणुऊर्जेची भूमिका याविषयी माहिती दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 च्या बजेटमध्ये अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील संशोधनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या अणूऊर्जा मिशनची घोषणा केली आहे. त्या माध्यमातून 2033 पर्यंत पाच लहान आणि मॉड्यूलर अणुभट्ट्या उभारता येणार आहेत.
( नक्की वाचा : अदाणी समूह सुरू करणार भारतातील सगळ्यात मोठा कौशल्य आणि रोजगार उपक्रम, मेक इन इंडिया उपक्रमाला मिळणार बळकटी )
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world