Ready Reckoner : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठा खड्डा पडल्याने राज्य सरकारकडून रेडिरेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राज्यात सगळीकडे घरं घेणं महाग होणार आहे. दोन वर्षांपूर्वी रेडिरेकनरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता रेडिरेकनरचे दर वाढविण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की वाचा - New Rules: UPI ते GST.. 1 एप्रिलपासून 'हे' 10 नियम बदलणार, तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार?
रेडिरेकनर म्हणजे काय?
मोकळी जमीन किंवा सदनिकांसारख्या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर राज्य सरकारकडून त्या मालमत्तेच्या मूल्याच्या प्रमाणावर स्टँप ड्यूटी घेतली जाते. ही स्टँड ड्यूटी थेट सरकारच्या तिजोरीत जाते. त्यामुळे सरकारची त्याकडे नजर असते. याशिवाय फसवणूक होऊ नये यासाठी सरकारकडून एक व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. या मालमत्तांचे मूल्य शहर-गावे आणि परिसरानुसार वेगवेगळे असते. सरकारकडून निश्चित केलेल्या या मूल्यांचा विभागवार तक्ता म्हणजे रेडीरेकनर.