जाहिरात

Gold Rate Today : मुंबईत 3000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा तुमच्या शहरात किती घसरले दर

Gold Rate Today : मुंबईत 3000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा तुमच्या शहरात किती घसरले दर
Gold and Silver Price Today
मुंबई:

Gold Silver Price Today:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी 6 टक्के कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषेनंतर काही तासांमध्येच सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Price in India) मोठी घसरण झाली आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झालं आहे. 

मुंबईकरांना मोठा दिलासा 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत दिवसभरात प्रती तोळा  3007 रुपये सोनं स्वस्त झालं आहे. मंगळवारी दुपारी बजेट जाहीर होण्यापूर्वी सोन्याचा दर प्रती तोळा 72609 रुपये होता. तो बजेटनंतर संध्याकाळी 5 वाजता 69602 रुपयांपर्यंत स्थिर झाला. बजेटनंतर काही काळ तर यामध्ये 5 हजारांपेक्षा जास्त घसरण झाली होती.  तर चांदीच्या दरात बजेटनंतर 3157 रुपये प्रती किलो घसरण झाली आहे. मुंबईत दुपारी 12 वाजता चांदीचा दर 87576 रुपये प्रती किलो होता. तो संध्याकाळी 5 वाजता 84919 रुपयांवर स्थिरावला. मुंबईपाठोपाठ पुण्यातही सोन्याचे दर 2 हजारांनी कमी झाले आहेत. 

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

नाशिकमध्ये सोमवारी सोन्याचा दर प्रती तोळा 72800 रुपये होते. तो आज (मंगळवार, 23 जुलै) 69500 रुपये झाला आहे. अर्थसंकल्पानंतर जळगाव सुवर्णनगरी सोन्याचे भाव प्रती तोळा 70 हजार 700 रुपये तर चांदीचा भाव 87 हजार किलो इतका झाला आहे. सकाळी अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा भाव 73 हजार 200 तर चांदीचा भाव 89 हजार 500 रुपये इतका होता. जळगावमध्ये अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या भावात प्रत्येकी 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. 

बीडमध्ये यापूर्वी सोन्याचा दर 72300 रुपये होता. तो बजेटनंतर 70,500 रुपये झाला आहे. वर्ध्यामधील एक तोळा सोन्याच्या दरात 74,000 रुपयांवरुन 71,300 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. नवी मुंबईमध्ये सोमवारी सोन्याचा दर 75,280 रुपये इतका होता. तो आता 70, 860 रुपये झाला आहे.  अमरावतीमध्येही सोन्याच्या दरामध्ये घसरण झालीय. प्रतीतोळा सोन्याचा दर 73 हजारांवरुन 71 हजारांवर आलाय. तर चांदीचा दर प्रती किलो 90 हजारांवरुन 87 हजार इतका कमी झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com