जाहिरात

EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार

EPFO ने आंशिक पैसे काढण्याच्या (Partial Withdrawal) नियमात बदल केला आहे. पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता EPFO ​​सदस्य त्यांच्या PF खात्यातून 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.

EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) आपल्या खातेधारकांना विविध सुविधा पुरवते. EPFO मध्ये गुंतवणुकीद्वारे बचतीशिवाय पेन्शनचाही लाभ मिळू शकतो. EPFO खातेधारकांना गरजेच्या वेळी अकाऊंटमधून पैसे देखील काढता येतात. पैसे काढण्याच्या मर्यादेच्या नियमात आता EPFO ​​ने बदल केले आहे. 

EPFO ने आंशिक पैसे काढण्याच्या (Partial Withdrawal) नियमात बदल केला आहे. पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता EPFO ​​सदस्य त्यांच्या PF खात्यातून 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.

(नक्की वाचा- PM Kisan 18th installment: पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?)

तसेच नोकरी सुरू केल्यापासून 6 महिन्यांतच खातेधारकांना आपले पैसे काढता येता येणार आहे. पूर्वी खातेधारकाला पूर्ण पैसे काढण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती, मात्र आता तसे नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 6 महिन्यांच्या आत नोकरी सोडली तर तो पीएफ खात्यातून पूर्ण पैसे काढू शकतो.

(नक्की वाचा-  सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठा बदल, 'हे' काम करा अन्यथा बंद होईल तुमचं खातं)

पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया

  • ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर जा. येथे मेंबर पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चाच्या मदतीने लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर, 'ऑनलाइन सर्व्हिस' वर जा.
  • आता फॉर्म- 31, 19, 10C आणि 10D पैकी एक निवडा.
  • यानंतर पर्सनल डिटेल्स व्हेरिफाय करा.
  • आता फॉर्म 31 निवडा आणि पैसे काढण्याचे कारण द्या.
  • यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी भरा आणि सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, 'ऑनलाइन सर्व्हिस' वर जा आणि क्लेम ट्रॅक करा. तुम्ही येथून क्लेम स्टेटस देखील तपासू शकता. 
  • क्लेमची रक्कम EPFO ​​द्वारे बँक खात्यात 7 ते 10 दिवसांत ट्रान्सफर केली जाते.

पैसे कधी काढू शकणार? 

EPFO खातेधारक वैद्यकीय, विवाह, शिक्षण किंवा कुटुंबातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
नवरात्रौत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, अदाणी इलेक्ट्रिसिटीचा निर्णय 
EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार
Adani Mundra Cluster Joins World Economic Forum's Transitional Industrial Clusters Initiative
Next Article
अदाणी मुंद्रा क्लस्टरचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रान्झिशनल इंडस्ट्रियल क्लस्टर्समध्ये समावेश