जाहिरात

PM Kisan 18th installment: पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?

योजनेचा फायदा कुटुंबातील एका व्यक्तीला मिळतो. अशावेळी पती की पत्नी कोणाला या योजनेचा लाभ होईल असा प्रश्न उपस्थित होतो. आज याबद्दल जाणून घेऊया. 

PM Kisan 18th installment: पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?
नवी दिल्ली:

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारने देशातील गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 17 हफ्ते जारी करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 18 वा हफ्ता मिळेल. 

योजनेच्या नियमांनुसार, या योजनेचा फायदा कुटुंबातील एका व्यक्तीला मिळतो. अशावेळी पती की पत्नी कोणाला या योजनेचा लाभ होईल असा प्रश्न उपस्थित होतो. आज याबद्दल जाणून घेऊया. 

शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजारांचा निधी..
पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये ट्रान्सफर करतं. प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. अशा प्रकारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा होतात. 

Gold Price Today: लग्नसराई आधी सोन्याचे भाव आभाळाला,  पहिल्यांदाच ओलांडला...

नक्की वाचा - Gold Price Today: लग्नसराई आधी सोन्याचे भाव आभाळाला, पहिल्यांदाच ओलांडला...

पती-पत्नी कोणाला मिळणार निधी?
या योजनेच्या नियमांनुसार, याचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्याला मिळतो. पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणा एकाला या योजनेचा फायदा मिळेल. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीच्या नावावर शेतीची जमीन असते त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतात. मात्र पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लँड वेरिफिकेशन करणं अनिवार्य असतं. 

पीएम किसानचा 18 वा हफ्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेचा 18 वा हफ्ता ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. याचा 17 वा हफ्ता जून 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. यानुसार ऑक्टोबर वा नोव्हेंबरमध्ये १८ वा हफ्ता ट्रान्सफर केला जाऊ शकतो. 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी आहे. त्यामुळे सरकार ऑक्टोबरमध्ये 18 वा हफ्ता ट्रान्सफर करण्याचा अंदाज आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: