जाहिरात

ideaForge कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलासा, चेन्नई कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द

चेन्नईच्या मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट कोर्टानं  ideaForge Technology Limited मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) विपूल जोशी यांच्या विरुद्धचे गैरजमानती वॉरंट रद्द केले आहे.

ideaForge कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलासा, चेन्नई कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द
मुंबई:

चेन्नईच्या मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट कोर्टानं  ideaForge Technology Limited मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) विपूल जोशी यांच्या विरुद्धचे गैरजमानती वॉरंट रद्द केले आहे. कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या जामिनाच्या प्रतीही कोर्टानं स्विकारल्या. या प्रकरणातील पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणाची यापूर्वीची सुनावणी 4 मार्च रोजी झाली होती. त्यावेळी कोर्टानं कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना  दोन जामीनदारांनासह 25 हजारांचा जामीन जमा करण्याचा आदेश दिला होती. तसंच कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. 

पण, त्यानंतर झालेल्या सुनावणीत कंपनीचे सीएफओ विपूल जोशी गैरहजर होते. तसंच इतर उच्च अधिकाऱ्यांनी सादर केलेल्यांकडून फक्त एक जामीन स्वीकारण्यात आला. त्याचबरोबर कंपनीचे जामीन भरण्यात आले होते.

त्यानंतर कोर्टानं कंपनीच्यी सीएफओ तसंच अन्य अधिकाऱ्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि सर्व कागदपत्र जमा करण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत दिली. त्यानंतर सर्व पक्षकार यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये उपस्थित होते. त्यांनी कोर्टाच्या निर्देशाचं पालन केलं. त्यानंतर अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टानं मागं घेतलं. 

( नक्की वाचा : Dharavi Redevelopment: रेल्वेच्या 40 एकर जमिनीचाही होणार उपयोग, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा )
 

न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, या खटल्यात सामील असलेल्या कलमांमध्ये अधिकारपदावरील व्यक्तींकडून विश्वासार्हतेचे गुन्हेगारी उल्लंघन, फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण, संगणक स्त्रोत दस्तऐवजांमध्ये छेडछाड करणे, संगणकाशी संबंधित गुन्हे आणि संगणक प्रणालीचे नुकसान करणे अशी तरतूद आहे.

IdeaForge Technology Ltd. ही 2007 मध्ये स्थापन झालेली भारतीय मानवरहित हवाई वाहन निर्मिती कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये ड्रोन इंडस्ट्री इनसाइट्सद्वारे ड्रोन उत्पादनात जागतिक दुहेरी श्रेणी (नागरी आणि संरक्षण) मध्ये तिसरे स्थान मिळवले आहे.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, 'या प्रकरणात आमच्या एका ग्राहकाने आमची बौद्धिक संपत्ती स्वतःची म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या उपकरणांशी छेडछाड करून राज्य सरकारांना खोटे निवेदन केले.'

 त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले गेले तेव्हा त्यांनी कंपनीला त्रास देण्याच्या उद्देशाने चुकीच्या कृती करण्यास सुरुवात केली, असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: