जाहिरात

Dharavi Redevelopment: रेल्वेच्या 40 एकर जमिनीचाही होणार उपयोग, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

Dharavi Redevelopment: रेल्वेच्या 40 एकर जमिनीचाही होणार उपयोग, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा
मुंबई:

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पानं  (Dharavi Redevelopment Project) एक मोठा निर्णय घेतला आहे. या महत्त्वकांक्षी योजनेनुसार पहिल्यांदाच रेल्वेच्या 40 एकर जमिनीचा उपयोग पुनर्विकासासाठी केला जाणार आहे. 

या ठिकाणी जवळपास 15000 ते 20,000 जणांना वसवण्यात येणार आहे. या घरांचे पुनर्निमाण केले जाणार आहे. NDTV हा प्रकल्पाच्या ठिकाणाचा दौरा केला तसंच रिपोर्टिंग देखील केलं आहे. त्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम वेगानं होत असल्याचं आढळून आलं. 

रेल्वे जमिनीचा उपयोग धारावीच्या पुनर्विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना फक्त घरं मिळणार नाहीत तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न देखील दूर होणार आहे. 

नवे घरं होणार, कुणीही बेघर होणार नाही

धारवी पुनर्विकास योजनेचे CEO SVR श्रीनिवास यांनी सांगितलं की,  पुनर्वसनादरम्यान मोठ्या संख्येने लोक बेघर होण्यापासून वाचवता यावेत यासाठी या जमिनीचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर केला जात आहे. धारावीतील रहिवासी त्यांच्या आवश्यक संसाधनांपासून आणि सुविधांपासून दूर न जाता नवीन घरांमध्ये स्थलांतरित होऊ शकतात, हे या योजनेतून निश्चित करण्यात येत आहे. 

( नक्की वाचा : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मोठी बातमी, सर्वेक्षणाचा नवा उच्चांक! )
 

रेल्वे कर्मचाऱ्यांनाही चांगली घरं

हा पुनर्विकास फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. या योजनेनुसार जुन्या, जर्जर रेल्वे क्वार्टर्सचे रुपांतर आधुनिक आणि सुव्यवस्थित घरांमध्ये केलं जाणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी यामुळे मदत होईल.  

धारावीची झोपडपट्टीची प्रतिमा बदलणे आणि तेथील रहिवाशांना चांगले जीवन देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पुढील काही वर्षांत पुनर्वसनाचा पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर धारावीतील इतर क्षेत्रांची पुनर्बांधणी केली जाईल.

या प्रकल्पामुळे धारावीचे सध्याचे स्वरुप बदलणार आहे. या संपूर्ण परिसराला आधुनिक आणि सोयीस्कर टाउनशिपमध्ये बदलण्याची अपेक्षा आहे.