
देशभरात आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज, 1 ऑगस्ट 2025 पासून देशभरातील 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 33.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
सिलेंडरच्या या कपातीमुळे
मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता 1582.50 रुपये झाला आहे. पूर्वी त्याची किंमत 1616 रुपये होती. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांच्या स्वयंपाकघरातील खर्चात यामुळे बचत होईल.
(नक्की वाचा- ITR Filing Deadline: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची 31 जुलैची मुदत चुकली? आता काय आहेत पर्याय? वाचा संपूर्ण माहिती)
घरगुती सिलेंडरच्या किमतीत बदल नाही
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाली असली तरी, 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती ग्राहकांना अजूनही जुन्याच दराने सिलेंडर खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांनुसार दरांमध्ये बदल करतात. या महिन्यातील बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहेत.
( नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )
घरगुती ग्राहकांनाही दरात कपातीची प्रतीक्षा आहे, कारण महागाईमुळे त्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण येत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती कमी झाल्यास, घरगुती सिलेंडरच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world