अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थ संकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थ संकल्पात मध्यम वर्गाची काळजी घेतली असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र या बजेटमध्ये बिहारवरही विशेष लक्ष दिलं गेलं आहे. बिहारमध्ये मखाना उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोर्ड स्थापन केले जाणार आहे. मिथिलांचलमध्ये पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाला विशेष आर्थिक सहाय्यता, पाटण्याच्या आयआयटीची क्षमता वाढवण्यासाठी निधी, नविन विमानतळ अशा घोषणा बिहारसाठी करण्यात आल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी हे बजेट ऐतिहासिक असल्याचं सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी या बजेटवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की आमच्या हे लक्षातच येत नाही की ही बजेट केंद्र सरकारचे आहे की बिहीरचे आहे. या बजेटमध्ये बिहार शिवाय अन्य कोणत्याच राज्याचं नाव ही नाही असं मनीष तिवारी म्हणाले. तर डीएमकेचे नेते दयानिधी मारन यांनी हे बजेट निराशजनक असल्याचं म्हटलं आहे. शिवाय हे बजेट दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून मांडलं असल्याचंही ते म्हणाले. टॅक्समध्ये दिलेली सुट ही भ्रामक असल्याचंही ते म्हणाले. मध्यम वर्गाला निराश करणारं हे बजेट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही या बजेटवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी यासाठी या बजेटमध्ये काहीच नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शहरात रोजगार गॅरंटीसाठी काहीच नाही असंही ते म्हणाले. विकास दर कोसळला आहे. उत्पन्न वाढीसाठी या बजेटमध्ये काहीच नाही. पेट्रोल, डिझेल आणि जीएसटीच्या दराबाबत काही निर्णय नाही. वित्तीय तुट वाढत आहे. त्यामुळे महागाई ही वाढणार आहे. सामान्यांसाठी या बजेटमध्ये काहीच नाही. त्यामुळे अपेक्षा भंग करणारे हे बजेत आहे. या बजेटने निराशा झाली आहे असंही ते म्हणाले.
विकासाच्या चार इंजिनाचा उल्लेख अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. याची ही काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले बजेटमध्ये इतके इंजिन आले की रेल्वेच पटरीच्या खाली उतरली आहे. अशा शब्दात त्यांनी या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी जुन्या बाटलीत नवी दारू असे वर्णन या अर्थसंकल्पाचे केले आहे. बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा द्या अशी मागणी त्यांनी केली. शिवाय या बजेटवर चर्चा झाली पाहिजे असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा
एकीकडे विरोधकांनी या बजेटवर जोरदार टीका केली असताना सत्ताधारी पक्षाने मात्र याचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेहमीच मध्यम वर्ग राहीला आहे. त्यामुळेच 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय हा मध्यमवर्गाला डोळ्या समोर ठेवून घेतला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. तर नवा भारत उभा करण्यासाठी हे बजेट महत्वाचे ठरणार आहे असं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. तर माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनीही या बजेटचे स्वागत केले आहे. तर हे मध्यमवर्गासाठीचे ड्रिम बजेट असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world