जाहिरात

Health insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये सवलत, मंत्रिगटात निर्णय

सध्या 18 टक्के दराने जीएसटी आकारला जात आहे. परिषदेने हा निर्णय स्वीकारला तर या दरात घट होईल. 

Health insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये सवलत, मंत्रिगटात निर्णय
नवी दिल्ली:

आयुर्विमा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या (Health insurance) हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये (GST) सवलत दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधित प्रस्ताव देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या 18 टक्के दराने जीएसटी आकारला जात आहे. परिषदेने हा निर्णय स्वीकारला तर या दरात घट होईल. 

ज्येष्ठ नागरिकांशिवाय इतरांना पाच लाखांपर्यंत आरोग्यविम्यावरील हफ्त्यातील जीएसटीमध्ये सवलत देण्याचे मंत्रिमंडळाने निश्चित केलं आहे. त्यापेक्षा जास्त रकमेचा विमा असल्यास 18 टक्के जीएसटी कायम राहील. मंत्रिमंडळांकडून दिलेल्या या प्रस्तावावरील अंतिम निर्णय जीएसटी परिषदेत घेतला जाईल. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या परिषदेच्या अध्यक्ष आहेत. या परिषदेत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. तेव्हा यावर निर्णय घेतला जाईल. 

पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?

नक्की वाचा - पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?

आरोग्य आणि आयुर्विम्याच्या हप्त्यांवरील करासंबंधी निर्णय घेण्यासाठी जीएसटी परिषदेने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत 13 सदस्यीय मंत्रिपद गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. या मंत्रिगटात उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात मेघालय, पंजाब, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतील मंत्र्यांचा समावेश आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Exclusive : रतन टाटांना सिंगूरलाच Nano चा कारखाना का उभारायचा होता? नीरा राडिया यांनी सांगितली कहाणी
Health insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये सवलत, मंत्रिगटात निर्णय
Muhurat Trading on Diwali 2024 date and time announce by nse bse share market
Next Article
Muhurat Trading on Diwali 2024 : 'मुहूर्त ट्रेडिंग'ची घोषणा; तारीख आणि वेळही आली समोर