विकास कुमार, मुंबई
यंदाच्या दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर म्हणजेच आज होणार आहे. ट्ऱेडिंग आणि गुंतवणुकीसाठी एक तासाचा मुहूर्त शुभ मानला जातो. आज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत मुहूर्तावर शेअर बाजार ट्रेडिंगसाठी उघडेल. HDFC सिक्युरिटीजचे डेप्युटी हेड ऑफ रिटेल रिसर्चच्या देवर्ष वकील यांना सांगितलं की, "गेल्या 3-4 वर्षांत शेअर बाजाराने चांगला परतावा दिला आहे. करेक्शनचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. 2-3 महिने अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पाऊस चांगला राहीला आहे, एकूण आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे. वर्षाचा दुसरा टप्पा आशादायी राहण्याची शक्यता आहे. दीर्घकाळासाठी सकारात्मक स्थिती आहे."
"RIL बॅटरी आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. रिटेल आणि टेलिकॉम व्हेंचर वेगवेगळी केली जाणार आहे त्याचाही फायदा होऊ शकतो. या कंपनीने केलेल्या गुंतवणुकीचा येणाऱ्या काळात चांगला फायदा होऊ शकतो. पुढच्या दिवाळीपर्यंत 3240 रुपयांपर्यंत शेअर पोहचू शकतो", असं देवर्ष वकील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा -LPG Cylinder : दिवाळीच्या दिवशी मोठा झटका, गॅस सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ)
SBI CAPS सिक्युरिटीजजे हेड ऑफ फंडामेंटल रिसर्च सन्नी अग्रवाल यांनी म्हटलं की, "कोविड काळानंतर चांगला परतावा मिळालेला पाहायला मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये परवाता वाढीचा दर हा 12-15 टक्के तर आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा दर 14-15 टक्के असण्याची शक्यता आहे. ज्या कंपन्या चांगली कामगिरी करतील त्या चांगल्या परतावा देतील."
अमेरिकेतली निवडणुका, अमेरिकेतली व्याजदर कपातीसंदर्भातील अनिश्चितता, अर्थसंकल्प या सगळ्याचा शेअर बाजारावर परिणाम होईल. पुढच्या दिवाळीपर्यंत ग्राहकोपयोगी वस्तू, टेलिकॉम, अपारंपरीक ऊर्जा क्षेत्र, पर्यटन, हॉटेलशी निगडीत क्षेत्रे या क्षेत्रांमधील शेअर्समध्ये चांगली कामगिरी बघायला मिळू शकते, अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- योजना बंद झाली तर? विरोधकांच्या आरोपांना जाहिरातीद्वारे उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न)
कोणते शेअर ठरु शकतात फायदेशीर?
- नाल्को- आशियातील मोठी कंपनी आहे. अॅल्युमिनिअमच्या किंमती वाढत आहेत. कंपनीने उत्पादन वाढवण्यावर लक्ष दिले आहे. पुढील 2 वर्षांत 30 टक्क्यांची नफ्याची वाढ पाहायला मिळू शकते. टार्गेट 270 रुपये इतके आहे.
- बँक ऑफ इंडिया- 95-105 दरम्यान शेअर खरेदी करावा, टार्गेट- 132.
- जेके लक्ष्मी सिमेंट- टार्गेट-936.
- ज्योथी लॅब्स- टार्गेट- 600.
- सन्नी अग्रवाल यांचे पिक्स
- भारती हेक्साकॉम- टार्गेट 1747 रुपये
- NAM-India- टार्गेट 825 रुपये
- शॅले हॉटेल (Chalet Hotel) - टार्गेट 1106 रुपये
- न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी (newgen)- टार्गेट 1475 रुपये
- टीटागड रेल सिस्टम्स(Titagarh Rail Sysytems Limited) - टार्गेट 1510 रुपये