जाहिरात

PF Interest: पीएफचे व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा! तुमच्या खात्यात पैसे आले का? चेक करा

EPFO Credited PF Interest: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 15 जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत देशातील सुमारे 35 कोटी सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्षाचे पीएफ व्याज जमा केले आहे.

PF Interest: पीएफचे व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा! तुमच्या खात्यात पैसे आले का? चेक करा
PF Interest Credit
(NDTV File Photo)

नोकरदार वर्गासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 15 जुलै 2026 पर्यंत सुमारे 35 कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात पीएफचे व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी 15 जुलैची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती आणि ईपीएफओने हे काम वेळेत पूर्ण केले असल्याची माहिती आहे.

ईपीएफओच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत व्याजाचे पैसे जमा झाले आहेत. यावर्षी सर्व खातेधारकांना 8.15 टक्के या दराने व्याज देण्यात आले आहे. ईपीएफओच्या 123 प्रादेशिक केंद्रांचे डेटाबेस एकत्रित करून एक केंद्रीय राष्ट्रीय डेटाबेस तयार केल्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण झाली.

मोबाईलवर सुरू झाले मेसेज येणे

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केल्यानुसार, नवीन पोर्टलच्या अपग्रेडेशननंतर व्याजाची प्रक्रिया ऑटो-प्रोसेस करण्यात आली. अनेक कर्मचाऱ्यांना गुरुवार, 15 जुलैपूर्वी, तर काहींना 15 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आणि उर्वरित लोकांना 16 जुलैच्या सकाळपर्यंत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पीएफचे व्याज जमा झाल्याचे मेसेज आले आहेत.

(नक्की वाचा-  Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')

दोन वर्षांपूर्वीपर्यंत पीएफचे व्याज नोव्हेंबर महिन्यापर्यंत जमा व्हायचे, तर गेल्या वर्षी ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत चालली होती. मात्र, तंत्रज्ञानातील बदलांमुळे यंदा जुलैमध्येच कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

व्याज जमा झाले की नाही या पद्धतींने तपासा

ईपीएफओ पोर्टल 

  • सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत पासबुक पोर्टलला भेट द्या.
  • तुमचा UAN नंबर (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • त्यानंतर 'Member ID' निवडा आणि 'View Passbook' वर क्लिक करा. तिथे तुम्हाला व्याजाच्या रकमेसह एकूण शिल्लक (PF Balance) दिसेल.

उमंग ॲप (UMANG App)

  • तुमच्या मोबाईलमधील 'UMANG' ॲप उघडा आणि 'EPFO' सर्च करा.
  • 'Employee Centric Services' (कर्मचारी केंद्रित सेवा) या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर 'View Passbook' निवडा. तुमचा UAN नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करून लॉग इन करा.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

एसएमएस सेवा (SMS Service)

  • इंटरनेट नसेल तरी तुम्ही मोबाईलवरून एसएमएस पाठवून बॅलन्स जाणून घेऊ शकता.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 7738299899 या क्रमांकावर 'EPFOHO UAN' असा मेसेज पाठवा. (उदा. EPFOHO 100XXXXXXXXX).
  • जर तुम्हाला माहिती मराठीत हवी असेल, तर शेवटी भाषेचे पहिले तीन अक्षरे जोडा (उदा. मराठीसाठी EPFOHO UAN MAR).
  • मिस कॉल सेवा (Missed Call Service)

हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्या.
कॉल आपोआप कट होईल आणि काही सेकंदांतच तुमच्या मोबाईलवर पीएफ बॅलन्स आणि व्याजाच्या तपशिलासह एसएमएस येईल.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com