जाहिरात

नोकरदारांसाठी गुड न्यूज! पुढील 15 दिवसांत PF व्याजाची रक्कम होणार जमा, 10 लाखांवर फायदा किती? जाणून घ्या गणित

EPFO Good News on PF Interest: ईपीएफओने पीएफ सबस्क्रायबर्ससाठी 8.25% दराने व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. तुमचे मंथली पीएफ कॅल्क्युलेशन कसे होते आणि 10 लाखांवर किती व्याज मिळेल, याचे सविस्तर गणित येथे पाहा.

नोकरदारांसाठी गुड न्यूज! पुढील 15 दिवसांत PF व्याजाची रक्कम होणार जमा, 10 लाखांवर फायदा किती? जाणून घ्या गणित
"PF Interest Credit From Today: पीएफवर किती मिळणार व्याजाची रक्कम?"
Source: NDTV Graphics/Canva

- रवीश रंजन शुक्ला, प्रतिनिधी

EPFO Good News on PF Interest: देशातील सरकारी असो वा खासगी, कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. PFच्या व्याजाबाबत मोठी बातमी आली आहे. जर तुमचाही देशातील 7.5 कोटी PF सबस्क्रायबर्समध्ये समावेश असेल तर ही बातमी तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. अधिकृत सूत्रांनी NDTVला दिलेल्या माहितीनुसार, PF चे व्याज आजपासून (3 जुलै) लोकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. अधिकाऱ्यांच्या मते पुढील 15 दिवसांत सर्व PF सबस्क्रायबर्सच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सर्व PF खातेधारकांना 8.25% दराने व्याजाची रक्कम दिली जाईल.

तुम्हाला किती व्याज मिळणार?

सरकारने वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी EPFO कडून ही माहिती देण्यात आली होती. बहुतांश लोक असेच गृहीत धरून चालत आहे की, 31 मार्च 2026 पर्यंत ज्या लोकांच्या PF खात्यात एकूण 10 लाख रुपये जमा असतील, त्यांना 8.25% दराने 82 हजार 500 रुपये मिळतील. अशाच प्रकारे ज्यांच्या PF खात्यात 20 लाख रुपये जमा असतील, त्यांना व्याज म्हणून एकरकमी 1.65 लाख रुपये मिळतील. या हिशोबाने 5 लाख रुपये असणाऱ्यांच्या खात्यातही 41,250 रुपये व्याज मिळणार आहे.

जर तुम्हीही असा विचार करत असाल तर तुमचे कॅल्क्युलेशन चुकीचे आहे. PF चे कॅल्क्युलेशन इतके सरळ नाही. PF अकाउंटमधील व्याजाचे कॅल्क्युलेशन प्रत्येक महिन्याच्या रनिंग बॅलन्सवर (Running Balance) केले जाते. पण हे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी 31 मार्च रोजी कॅल्क्युलेट करून क्रेडिट केले जाते.

(नक्की वाचा: ITR Deadline 2026: जुलैमधील 3 महत्त्वाच्या तारखा, ITR फायलिंग आणि TDSची काम आटोपून घ्या अन्यथा बसेल मोठा फटका)

PF च्या व्याजाचे कॅल्क्युलेशन समजून घ्या | PF Interest Calculation Formula

EPFO तुमच्या PF च्या व्याजाचे कॅल्क्युलेशन प्रत्येक महिन्याच्या क्लोजिंग बॅलन्सवर करते. सरकार वार्षिक व्याजदराची घोषणा करत असल्याने प्रत्येक महिन्याच्या क्लोजिंग बॅलन्सवर व्याज कॅल्क्युलेट करण्यापूर्वी वार्षिक व्याजदराला 12 या संख्येने भागाकार करावा.  यावेळी सरकारने 8.25 टक्के वार्षिक व्याजदराची घोषणा केली आहे. महिन्यासाठी व्याजदर काढावा लागेल.

  • महिन्यानुसार व्याजदराचा फॉर्म्युला: 12×100/वार्षिक व्याजदर
  • यावेळी महिन्यानुसार व्याजदर असेल = 12×100/8.25 = 0.006875 म्हणजेच 0.6875%

दरमहा 10,000 जमा होतात तर किती व्याज मिळेल?

असे मानूया की तुम्ही 1 एप्रिल 2025 पासून नोकरी सुरू केली आहे आणि दरमहा 10,000 रुपये PF खात्यात जमा होते. म्हणजेच मार्च अखेरपर्यंत केवळ PF चे 1,20,000 रुपये झाले. आता समजून घेऊया की व्याजासह तुमचा एकूण कॉर्पस (Corpus) काय असेल.

एप्रिल 2025

एप्रिल महिन्यातील जमा रक्कम: 10,000 रुपये
मंथली क्लोजिंग बॅलन्स: 10,000 रुपये
एप्रिलचे व्याज: 10,000×(12×100/8.25) = 10,000×0.006875 = 68.75 रुपये

मे 2025

मे महिन्याचे क्लोजिंग बॅलन्स: 10,000 + 10,000 = 20,000 रुपये
मे चे व्याज: 20,000×(12×100/8.25) = 137.50 रुपये

जून 2025

जूनचा क्लोजिंग बॅलन्स: 30,000 रुपये
जून महिन्याचे व्याज: 30,000×(12×100/8.25) = 206.25 रुपये

अशाच प्रकारे दरमहा क्लोजिंग बॅलन्स 10-10 हजार रुपयांनी वाढत जाईल आणि त्यावर व्याजाची रक्कमही वाढत जाईल.

कोणत्या महिन्याचे किती व्याज जोडले जाईल?

  • एप्रिल 2025 मधील व्याजाची रक्कम = 68.75 रुपये
  • मे 2025 मधील व्याजाची रक्कम = 137.50 रुपये
  • जून 2025 मधील व्याजाची रक्कम = 206.25 रुपये
  • जुलै 2025 मधील व्याजाची रक्कम = 275.00 रुपये
  • ऑगस्ट 2025 मधील व्याजाची रक्कम = 343.75 रुपये
  • सप्टेंबर 2025 मधील व्याजाची रक्कम = 412.50 रुपये
  • ऑक्टोबर 2025 मधील व्याजाची रक्कम = 481.25 रुपये
  • नोव्हेंबर 2025 मधील व्याजाची रक्कम = 510.00 रुपये
  • डिसेंबर 2025 मधील व्याजाची रक्कम = 618.75 रुपये
  • जानेवारी 2025 मधील व्याजाची रक्कम= 687.50 रुपये
  • फेब्रुवारी 2025 मधील व्याजाची रक्कम = 756.25 रुपये
  • मार्च 2025 ममधील व्याजाची रक्कम = 825.00 रुपये

या प्रकारे एकूण व्याज: 5,362.50 रुपये

31 मार्चपर्यंतच्या जमा रकमेवर व्याज जोडून तुमचा कॉर्पस तयार होईल.
म्हणजेच 1,20,000 + 5,362.50 = 1,25,362.50 रुपये

आता ही रक्कम आर्थिक वर्ष 2026-27 साठी ओपनिंग बॅलन्स होईल. म्हणजेच एप्रिलमध्ये (1,25,362.50 + 10,000) एकूण 1,35,362.50 रुपयांवर व्याजाचे कॅल्क्युलेशन होईल.

10 लाख रुपये असणाऱ्यांना व्याजात मिळतील 78,0000 रुपये

आता हे कॅल्क्युलेट करूया की ज्यांच्या PF खात्यात 31 मार्च 2026 पर्यंत एकूण 10 लाख रुपये असतील, त्यांना किती व्याज मिळेल.
समजा आपण दरमहा 10,000 रुपयांच्या PF वरच कॅल्क्युलेट केले तर 2025-26 साठी एकूण PF असेल - 1,20,000 रुपये.
याचा अर्थ आधीपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2025 रोजी त्यांचा क्लोजिंग बॅलन्स राहिला असेल - 8,80,000 रुपये.

कॅल्क्युलेशन

31 मार्च 2025 चा क्लोजिंग बॅलन्स: 8,80,000 रुपये
2025-26 मध्ये एकूण नवीन PF जमा: 1,20,000 रुपये
EPFO व्याज महिन्याच्या क्लोजिंग बॅलन्सवर जोडते
मासिक व्याजदर: 8.25% / 12 = 0.6875%

महिन्यानुसार किती मिळणार व्याज 

  • एप्रिल 2025: 8,90,000 वरील व्याज रक्कम = 6,118.75 रुपये
  • मे 2025: 9,00,000 वरील व्याज रक्कम = 6,187.50 रुपये
  • जून 2025: 9,10,000 वरील व्याज रक्कम = 6,256.25 रुपये
  • जुलै 2025: 9,20,000 वरील व्याज रक्कम = 6,325.00 रुपये
  • ऑगस्ट 2025: 9,30,000 वरील व्याज रक्कम = 6,393.75 रुपये
  • सप्टेंबर 2025: 9,40,000 वरील व्याज रक्कम = 6,462.50 रुपये
  • ऑक्टोबर 2025: 9,50,000 वरील व्याज रक्कम = 6,531.25 रुपये
  • नोव्हेंबर 2025: 9,60,000 वरील व्याज रक्कम = 6,600.00 रुपये
  • डिसेंबर 2025: 9,70,000 वरील व्याज रक्कम = 6,668.75 रुपये
  • जानेवारी 2026: 9,80,000 वरील व्याज रक्कम = 6,737.50 रुपये
  • फेब्रुवारी 2026: 9,90,000 वरील व्याज रक्कम = 6,806.25 रुपये
  • मार्च 2026: 10,00,000 वरील व्याज रक्कम = 6,875.00 रुपये

एकूण व्याज = 77,962.50 रुपये

याचा अर्थ 10,000 रुपये PF मिळणाऱ्या ज्या व्यक्तीच्या खात्यात 31 मार्चपर्यंत 10 लाख रुपये राहिले असतील त्यांना 77 हजार 962.50 रुपये व्याजाची रक्कम मिळेल. म्हणजेच त्यांच्या खात्यात व्याज जोडून एकूण कॉर्पस फंड 10,77,962.50 रुपये इतका होईल

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com