जाहिरात

तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय

अखिल भारतीय व्यापारी महासंघा म्हणजेच  Confederation of All India Traders ने देखील तुर्किए आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवा असे आवाहन भारतभरातील व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.

तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय
मुंबई:

दहशतवादाला खतपाणी देत सतत त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या पाकिस्तानला तुर्किए आणि अझरबैजान या दोन देशांनी पाठिंबा दिला. यामुळे भारतीयांनी या दोन देशांना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. या दोन देशांत भारतातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात होते. आता भारतीय पर्यटकांनी या दोन देशांत जाणे बंद केले आहे.

तुर्किएतून येणारी फळे खासकरून सफरचंदे आणि घराच्या सजावटीसाठी वापरले जाणारे महागडे दगड हे देखील खरेदी करणं भारतातील व्यापाऱ्यांनी बंद केलं आहे.  यात आता जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टीक काऊन्सिलही उतरली आहे. GJC चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी याबाबतचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सगळे ज्वेलर्स, उत्पादक, व्यापारी आणि घाऊक विक्रेते यांना आवाहन करतो आहे की त्यांनी तुर्किए आणि अझरबैजान या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवावा. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्र हे देशाच्या समर्थनासाठी एकजुटीने उभे आहे. 

नक्की वाचा :कोरोना पुन्हा आला! हाँगकाँग, सिंगापूरमध्ये अचानक वाढली रुग्णांची संख्या, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

राजेश रोकडे यांनी NDTV मराठीला माहिती देताना सांगितले की तुर्किएतून अंदाजे 30-40 टन दागिन्यांची भारतामध्ये आयात होत असते. मात्र ही सगळी आयात बंद व्हावी आणि तिथल्या दागिन्यांसारखे दागिने भारतातच बनावे यासाठी आम्ही आग्रही आहोत. तुर्किएतून भारतामध्ये बांगड्या आणि नेकलेस मोठ्या प्रमाणावर आयात होत असतात. तिथल्या दागिन्यांच्या डिझाईनने भारतामध्ये तयार होणाऱ्या दागिन्यांना तुर्किए ज्वेलरी म्हटलं जातं. हे नाव बदलून आता सिंदूर ज्वेलरी करण्यात येणार असल्याचंही रोकडे यांनी सांगितले. 

नक्की वाचा : 'त्या' कंपन्यांनी स्वतःहून निघून जावं...', भारत- पाक संघर्षानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा

व्यापारी संघटनेचीही बहिष्काराची हाक

अखिल भारतीय व्यापारी महासंघा म्हणजेच  Confederation of All India Traders ने देखील तुर्किए आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवा असे आवाहन भारतभरातील व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे. या दोन देशांसोबत आयात आणि निर्यात दोन्ही थांबवा असे व्यापारी महासंघाने आवाहन केले आहे. व्यापारी संघटनेने चित्रपटसृष्टीलाही आवाहन केले आहे की त्यांनी या दोन देशांत चित्रीकरण करू नये. हे आवाहन झुगारून ज्या कंपन्या, व्यापारी या दोन देशांसोबत व्यवहार करतील त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचाही इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com