जाहिरात

Gold and Silver Price Drop: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी 6 हजारांनी स्वस्त; चेक करा सोन्याचा आजचा भाव

जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि नफा वसुलीमुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात 1000 रुपयांची, तर चांदीच्या भावात तब्बल 6000 रुपयांची घट झाली.

Gold and Silver Price Drop: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी 6 हजारांनी स्वस्त; चेक करा सोन्याचा आजचा भाव

मंगेश जोशी, जळगाव

Gold-Silver Rates: सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि नफा वसुलीमुळे जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज लक्षणीय घसरण पाहायला मिळाली आहे.

सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा भाव 1 लाख 56 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात सर्वात मोठी म्हणजेच 6000 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर आता 2 लाख 68 हजार रुपयांवर आला आहे.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

दर कमी होण्याचे मुख्य कारण?

बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि मोठ्या प्रमाणावर झालेली नफा वसुली यामुळे सोने-चांदीच्या किमतीवर थेट परिणाम झाला असून हे दर खाली आले आहेत.

(नक्की वाचा-  Crime News: प्रियकरासाठी कोट्यवधींची चोरी, प्रेयसी आंघोळीला जाताच भलतंच घडलं; प्रेमाचा भयंकर शेवट)

अधिक मासात सोने खरेदीला पसंती

सध्या सुरू असलेल्या अधिक महिन्याच्या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून मोठी पसंती दिली जात आहे. मात्र, आज दरात काहीशी घसरण झाली असली, तरी गेल्या काही महिन्यांत या दोन्ही धातूंचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे आजही सोने-चांदी खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत असून, बजेट सांभाळण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड करावी लागत असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com