जाहिरात

Gold Rate: सोन्याचे दर प्रतितोळे 3 लाखांवर पोहोचणार? युद्धामुळे सोन्यात ऐतिहासिक तेजीचे संकेत

Gold Price Prediction : पुढील 5 वर्षांत सोन्याचे दर दुप्पट होऊन सुमारे ३ लाख रुपये पोहोचतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणि भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे.

Gold Rate: सोन्याचे दर प्रतितोळे 3 लाखांवर पोहोचणार? युद्धामुळे सोन्यात ऐतिहासिक तेजीचे संकेत

Gold Price Prediction: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलापासून ते रिअल इस्टेटपर्यंत सर्वच क्षेत्रांवर याचे परिणाम जाणवत असले, तरी सोन्याच्या किमतींबाबत तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणारा आहे.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे गणित बिघडले असतानाच, गुंतवणूकदारांसाठी सोने हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरत आहे. जागतिक स्तरावरील नामवंत ब्रोकरेज फर्म 'जेफरीज'ने सोन्याच्या किमतीबाबत एक अत्यंत धाडसी दावा केला आहे. त्यांच्या मते, पुढील पाच वर्षांत सोन्याचे दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतात.

सोन्याचा भाव 3 लाखांवर जाणार?

'जेफरीज'चे इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख ख्रिस वूड यांनी 'ईटी नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, सोन्याची किंमत आगामी 5 वर्षांत 10 हजार डॉलर्स म्हणजेच 3 लाख प्रति तोळे सहज पोहोचू शकते. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची मोठी खरेदी आणि सध्याचे गंभीर भूराजकीय संकट ही सोन्याच्या तेजीची मुख्य कारणे आहेत.

(नक्की वाचा-  T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)

युद्धाचा सोन्यावर कसा परिणाम झाला?

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सोन्याला 'सेफ हेवन' मालमत्ता म्हणून मोठी मागणी मिळाली आहे. जेव्हा शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमध्ये जोखीम वाढते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. युद्धाच्या काळात जागतिक चलनांमध्ये अस्थिरता निर्माण होते, अशा वेळी सोन्याचे मूल्य स्थिर राहते किंवा वाढते. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणामही मौल्यवान धातूंच्या दरांवर होत आहे.

(नक्की वाचा-  Iran News: अण्वस्त्र चाचणी की भूकंप? युद्धादरम्यान इराणची जमीन हादरली; जगभरात चिंतेचं वातावरण)

तज्ज्ञांचे मत काय?

अनेक तज्ज्ञांच्या मते, युद्धाचा परिणाम कालांतराने कमी होईल आणि बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल. मात्र, सोन्याच्या बाबतीत बदललेली मानसिकता आणि वाढलेली मागणी यामुळे सोन्यातील ही 'बुल मार्केट' दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असे संकेत बाजारातील हालचालींवरून मिळत आहेत. मात्र, सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असल्याने त्यात चढ-उतार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com