देशभरात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं प्रतितोळा 92 हजारांवर गेलं आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ज्यांनी आधीच गुंतवणूक केली होती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मात्र जे गुंतवणुकीसाठी किंमती कमी होण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी गुडन्यूज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकेतील विश्लेषकांनी सोन्याबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही वर्षात सोन्याच्या दरात 38 ते 40 टक्के घसरण होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. म्हणजेच सोनं जवळपास 57 हजार रुपयांवर येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील 'मॉर्निंगस्टार'चे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूकदारांची चांदी होईल.
(नक्की वाचा- Waqf Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर; बाजूने 128, विरोधात 95 मते)
अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स म्हणतात की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. मिल्स यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचे भाव प्रति औंस 1820 डॉलरपर्यंत घसरू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3132.71 प्रति औंसवर चालू आहेत. जॉन मिल्स यांचा अंदाज खरा ठरला तर या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असेल.
सोन्याचे दर का घसरू शकतात?
सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता का आहे, हे देखील विश्लेषक जॉन मिल्स यांनी स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठा यातील तफावत येत्या काही वर्षांत झपाट्याने कमी होऊ शकते. जेव्हा सोने महाग होते, तेव्हा त्याचे खाणकाम वाढते. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणकामाचा सरासरी नफा 950 डॉलर प्रति औंस होता, जो 2012 नंतरचा सर्वाधिक आहे.
(नक्की वाचा- Pandharpur News : शहाजीबापू पाटलांनी भर सभेत थोबाडीत मारून घेतली, नेमकं काय घडलं?)
गेल्या वर्षी जगातील सोन्याच्या एकूण साठ्यात 9 टक्के वाढ झाली. अनेक देश सोन्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. याशिवाय जुन्या सोन्याचाही पुनर्वापर केला जात आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध सोन्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अधिक पुरवठ्यामुळे किमतीवर दबाव वाढेल आणि ते स्वस्त होईल, असा अंदाज जॉन मिल्स यांनी व्यक्त केला आहे.