
लोकसभेनंतर राज्यसभेत 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. याआधी बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले.
आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. लोकसभेत 288 खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधेयकावरील चर्चेदरम्यान बिजू जनता दलाने (बीजेडी) आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला नाही. पक्षाने म्हटले होते की खासदारांनी त्यांच्या विवेकाचे ऐकावे आणि वक्फ विधेयकावर निर्णय घ्यावा.
(नक्की वाचा- Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परीक्षा)
राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, या ऐतिहासिक विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, तर कोट्यवधी गरीब मुस्लिमांना फायदा होईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर, लोक त्याचे स्वागत करतील. यावेळी रिजिजू यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला की, मुस्लिमांना घाबरवणारे तुम्हीच आहात, आम्हाला नाही. त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(नक्की वाचा- Waqf Bill : JDU आणि TDP चा पाठिंबा भाजपानं कसा मिळवला? वाचा Inside Story)
वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची गरज का?
वक्फ मालमत्तेच्या देखभाल आणि व्यवस्थापनातील त्रुटी आणि भ्रष्टाचार दूर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. जुन्या कायद्यांमध्ये ज्या कमतरता होत्या त्या दूर केल्या पाहिजेत आणि वक्फ बोर्डाची क्षमता सुधारली पाहिजे. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता आणली पाहिजे. वक्फची व्याख्या अद्ययावत केली पाहिजे. वक्फ मालमत्तेच्या नोंदणीची प्रक्रिया सुधारली पाहिजे. वक्फ नोंदी मॅनेज करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world