Gold Price News : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्यात दरात घसरण होत असल्याचा पाहायला मिळत होती. मात्र 1 जुलै रोजी सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ झाली आहे. नागपूर सराफा बाजार सोन्याच्या आजचा दर 97 हजार 100 रुपयांवर पोहोचला आहे.
जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याचा दर 96 हजार 200 रुपयांवर होता. तर 1 जुलै रोजी दर 97 हजार 100 रुपये होता. अशारितीने सोन्याच्या दरात एका दिवसात 900 रुपयांचा वाढ झाली आहे. मेकिंग शुल्क, हॉलमार्क शुल्क आणि जीएसटी वगळून हे दर आहेत. मेकिंग शुल्क किमान 13 टक्के आणि त्याहून अधिक असावे.
(नक्की वाचा- NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)
इंडियन बुलियन मार्केटनुसार इतर शहरातील दर
- मुंबई- 98400 रुपये प्रतितोळे
- पुणे - 98400 रुपये प्रतितोळे
- नाशिक- 98430 रुपये प्रतितोळे
- सोलापूर- 98400 रुपये प्रतितोळे
- कोल्हापूर- 98400 रुपये प्रतितोळे
- ठाणे- 98400 रुपये प्रतितोळे
(नक्की वाचा- Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?)
आठवडाभरात सोन्याच्या दरात साडेतीन हजारांची घसरण
सोन्याच्या दरात 23 जून ते 30 जून या कालावधीत, 24 कॅरेटमधील 10 ग्रॅम सोन्याच्या किमती 3490 रुपयांनी घसरल्या आहेत. इस्रायल आणि इराणने युद्धबंदी मान्य केल्यापासून सर्वात जास्त घसरण दिसून आली. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर, गुंतवणूकदारांचं सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे असलेलं आकर्षण कमी झाल्याचे दिसून येत आहे.