जाहिरात

Gold Price : सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर, लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण?

Gold Price Today : सोन्याच्या दरात आज दिवसभरात (16 एप्रिल 2024) प्रतीतोळा 16,000 रुपये वाढ झाली आहे.

Gold Price : सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर, लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण?
मुंबई:

Gold Price Today : सध्या सर्वत्र लग्न सराईचे दिवस आहेत. या काळात सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. त्याचबरोबर गुंतवणूक म्हणूनही अनेक जण सोन्याची खरेदी करत असतात. या सर्वांचा खिसा आता आणखी रिकामा होणार आहे. सोन्याच्या दरात आज दिवसभरात (16 एप्रिल 2024) प्रतीतोळा 16,000 रुपये वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा भाव हा 98 हजार 100 रुपये प्रतीतोळा होता. त्यामुळे सोनं आता एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

अमेरिकेनं लावलेलं समसमान कराचं धोरण हे मागच्या आठवड्यात स्थगित करण्यात आले. सध्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध हे टीपेला पोहोचले आहे. अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या मालावर 245 टक्के कर लावला आहे. त्यामुळे दोघांमधील व्यापार जवळपास थांबला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागलाय. 

करयुद्ध आणि अस्थिर अर्थव्यवस्था यामुळे महागाईही वाढेल. अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. सोने कमी व्याजदराच्या वातावरणात चांगले परतावे देते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीचा कल वाढला आहे. 

आगामी काळात सोन्याचा दर हा एक लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक परतावा हवा असेल तर सोनं खरेदी करा असा सल्लाही गुंतवणूक तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे. 

Donald Trump : आयत करावरील स्थगितीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक U Turn, 'या' गोष्टींना मोठा दिलासा

( नक्की वाचा :  Donald Trump : आयत करावरील स्थगितीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक U Turn, 'या' गोष्टींना मोठा दिलासा )


कर्ज काढा आणि सोनं घ्या

ऑल इंडिया जेम्स अँण्ड ज्वेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे हे 'NDTV मराठी' वरील 'मनी टाईम' या कार्यक्रमात दोन महिन्यांपूर्वी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कर्ज काढून सोनं खरेदी करा असा सल्ला दिला होता. येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढणार आहेत. त्यामुळे घरात पैसे असतील तर ते सोन्याच्या खरेदीत गुंतवा. ते पैसे बँकेत ठेवूनही त्यातून मिळणारा परतावा हा सोने खरेदीच्या तुलनेत कमी असेल. त्यामुळे कर्ज काढा आणि सोनं खरेदी करा असा सल्लाही त्यांनी या निमित्ताने दिला आहे. सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी योग्य आहे, असं रोकडे यांनी स्पष्ट केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com