अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक ठरेल फायद्याची, 3 कारणांमुळे सोने आणखी महागणार?

अक्षय्य तृतीया सोनं खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. मात्र यावर्षी सोन्याच्या किंमतीत आलेल्या उसळीमुळे सोने खरेदी करावं की नाही अशा द्विधा मन:स्थितीत नागरिक आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

विकास कुमार, मुंबई

भारतीयांचं सोन्याच्या दागिन्यांवरील प्रेम लपून राहिलेलं नाही. सोनं खरेदीसाठी भारतीयांना केवळ कारण लागतं. मात्र सोन्याकडे केवळ दागिने म्हणून न पाहता गुंतवणूक म्हणून देखील पाहिलं जातं. कारण सोनं ही एक अशी गुंतवणूक आहे जी अडचणीच्या काळात पटकन कामी येते. सोनं विकून त्याचं तातडीने पैशात रुपांतर करता येतं. 

अक्षय्य तृतीया सोनं खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. मात्र यावर्षी सोन्याच्या किंमतीत आलेल्या उसळीमुळे सोने खरेदी करावं की नाही अशा द्विधा मन:स्थितीत नागरिक आहेत. सोन्याच्या किंमतींनी MCX वर 72,500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या टप्प्यावर सोनं खरेदी योग्य आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोन्याची किंमत आणखी वाढणार?

सोन्याच्या किंमतींवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. जिओपॉलिटिकलपासून ते सेंट्रल बँकांची धोरणे यांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. सोन्याच्या किंमती आणखी वाढतील असा अंदाज मोतीलाल ओसवालचे फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी आणि करन्सी हेड किशोर नर्ने यांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या किंमती 75 ते 76 हजारांपर्यंत वाढू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी 3 घटक महत्त्वाचे असल्याचे ठरु शकतात.

(नक्की वाचा- रजा टाकली, मोबाइल बंद केले, 300 कर्मचारी अचनाक सुट्टीवर, एअर इंडियाची 86 उड्डाणं रद्द)

  1. युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. युद्धाच्या काळात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली. कारण अशा स्थितीत लोक सोन्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानतात. 
  2. अनेक सेंट्रल बँकांकडून व्याजदर कपातीची आशा आहे. याचा परिणाम देखील सोन्याच्या दरांवर झाला. कारण व्याजदरात कपात झाल्यास सोन्याच्या गुंतवणुकीत नागरिकांचा कल वाढतो. त्यामुळे देखील सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
  3. जानेवारी ते मार्चदरम्यान अनेक सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. या खरेदीमुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या दर कोसळण्याची शक्यता कमी होते. 

(नक्की वाचा- शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्याचा NSEचा प्रस्ताव सेबीने फेटाळला)

सोन्यात गुंतवणुकीचा स्मार्ट पर्याय

सॉवरेन गोल्ड बॉण्ड रिटेल गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. कारण ही सरकारची योजना आहे. तसेच मॅच्युरिटीपर्यंत होल्ड केल्यास कॅपिटल गेन टॅक्समध्येही सूट मिळते, असं किशोर नार्ने यांनी म्हटलं.  

Advertisement

डिजिटल गोल्ड हा देखील गुंतवणुकीचा पर्याय असल्याचं किशोर नार्ने यांनी म्हटलं आहे. मात्र यामध्ये सुरक्षिततेबाबत काही प्रमाणात चिंता आहे. कारण डिजिडल गोल्डबाबत अद्याप कोणतेही नियम नाहीत, असंहीत्यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article