एअर इंडिया एक्सप्रेसची जवळपास जवळपास 86 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाचे जवळपास 300 कर्मचारी एकत्रीत सीक लिव्हवर गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळ पर्यंत जवळपास 86 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जवळपास 300 वरिष्ठ केबिन क्रू सदस्यांनी शेवटच्या क्षणी आपण आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वत: चे मोबाईलही बंद करू ठेवले. शेवटी एअर इंडियाला आपली उड्डाणं रद्द करण्या शिवाय पर्याय राहीला नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान जे कर्मचारी अचानक सुट्टीवर गेले आहेत, त्यांच्या बरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न एअर इंडियाचे व्यवस्थापन करत आहेत. हे कर्मचारी एअर इंडियात नव्यानं ज्या अटीशर्ती लागू केल्या आहेत त्याला त्यांचा विरोध आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.' आमचे केबिन क्रू अनेक सदस्य अचानक अजारी पडले आहेत. त्यामुळे आमच्या अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही उशिराने उड्डाण करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करत आहोत. त्यामुळे प्रवाशांना असुविधा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
#WATCH | Kerala: Passengers at Thiruvananthapuram airport face difficulties as more than 70 international and domestic flights of Air India Express have been cancelled after senior crew member of the airline went on mass 'sick leave'. pic.twitter.com/c234yIzedA
— ANI (@ANI) May 8, 2024
हेही वाचा - लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का? अपक्षांनी पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात?
झालेल्या प्रकाराबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे. शिवाय ही बाब एअर इंडियाला शोभा देणारी नाही याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ज्या फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत त्याचे सर्व पैसे प्रवाशांना दिले जातील. किंवा ज्यांना अन्य दिवसाची बुकींग करून हवी आहे तीही दिली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
#WATCH | A passenger, Amrita says "I had to fly to Muscat today morning at around 8 am, but my flight was cancelled. I had to urgently leave for Muscat as there was a medical emergency. After an argument with the airline staff, I was provided with a ticket for tomorrow. The… pic.twitter.com/GP90PwXjtf
— ANI (@ANI) May 8, 2024
हेही वाचा - 'प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
विमान उड्डाणं रद्द झाल्याने अनेक प्रवाशांनी आपला राग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. उड्डाणं रद्द केली याची कोणतीही माहिती दिली गेली नाही अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. तर काहींनी ट्वीटरच्या माध्यमातून जेव्हा आम्ही विमानतळावर पोहोचलो तेव्हा आम्हाला आमचे फ्लाईट रद्द झाले आहे याची माहिती मिळाल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. याबाबत एअर इंडियाने प्रवाशांची माफी मागितली आहे.
हेही वाचा - मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?
एअर इंडियाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप गेल्या महिन्यात केबिन क्रूच्या एका संघटनेने केला होता. शिवाय कर्मचाऱ्यांना एकसमान वागणूक दिली जात नाही. त्याच बरोबर व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबळ कमी झाल्याचा आरोपही एक संघटनेने केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world