Gold Rate Today on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना किंचित दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात आज प्रतितोळे 400 रुपयांपेक्षा जास्तीची घसरण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
30 एप्रिल रोजी सकाळच्या दरानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतितोळे 94 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी 87 हजार 200 रुपये, 18 कॅरेट सोन्यासाठी 72 हजार 800 रुपये, 14 कॅरेट सोन्यासाठी 60 हजार 300 रुपये आजचे दर आहे.
चांदीचे दर देखील प्रतिकिलो 98 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी वगळून आहे. मेकिंग चार्जेस किमान 13 टक्के आकारले जातात. म्हणजे हे सर्व चार्जेस मिळून सोन्याच्या दरात आणखी वाढ होते.
(नक्की वाचा- Akshaya Tritiya 2025: सोन्याच्या दरात मोठी सूट, 'या' ब्रँड्सची मेगा ऑफर)
सोन्याच्या दरात वर्षभरात 24000 रुपयांची वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात 24 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला सोन्याचे भाव 71 हजार 500 रुपयांवर होते. 22 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 1 लाख रुपयांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर सोन्याने अद्याप 1 लाख रुपयांची पातळी गाठलेली नाही.
(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
सोन्याच्या दरात चढ-उतार का?
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे आणि टॅरिफ वादामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वेगाने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतातही त्याच्या किमती वाढल्या आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, जर परिस्थिती सामान्य राहिली तर पुढील सहा महिन्यांत सोन्याचा भाव प्रतितोळे 75 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. पण जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याची किंमत प्रतितोळे सव्वा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.