जाहिरात

Akshaya Tritiya 2025: सोन्याच्या दरात मोठी सूट, 'या' ब्रँड्सची मेगा ऑफर

या ऑफरमध्ये जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करण्याचाही उत्तम पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Akshaya Tritiya 2025: सोन्याच्या दरात मोठी सूट, 'या' ब्रँड्सची मेगा ऑफर
नवी दिल्ली:

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या ज्वेलरी ब्रँड्सनी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. 30 एप्रिल 2025 ला अक्षय तृतीया आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.22 एप्रिल 2025 रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेले होते. त्यानंतर दरात थोडी घसरण झाली. मात्र सोन्याच्या गुंतवणुकीची क्रेझ अजूनही कायम आहे. लोक आजही सोन्याचे शिक्के आणि दागिने खरेदी करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या अक्षय तृतीयेला कोणते खास ऑफर्स मिळत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Kalyan Jewellers वर 50% पर्यंत मोठी सूट

Kalyan Jewellers अक्षय तृतीयेनिमित्त सर्वात मोठी सूट देत आहे. येथे सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग charges वर 50% पर्यंतची सूट मिळत आहे. यासोबतच, ॲडव्हान्स बुकिंग केल्यास तुम्हाला सध्याच्या सोन्याच्या दरावर तुमची सोन्याची वस्तू  लॉक करण्याची संधी मिळेल. तसेच, जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करण्याचाही उत्तम पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यावर काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान, CM फडणवीस संतापले, सडकून टीका केली!

Reliance Jewels देत आहे 25% पर्यंत सूट

Reliance Jewels देखील या खास प्रसंगी ऑफर देत आहे. 5 मे 2025 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग charges वर 25% पर्यंत सूट आणि डायमंड ज्वेलरीवर डायमंड व्हॅल्यू आणि मेकिंग charges मिळून 30% पर्यंत सूट मिळत आहे. याव्यतिरिक्त, जुन्या सोन्यावर 100% एक्सचेंज व्हॅल्यू देखील उपलब्ध आहे.

ट्रेडिंग बातमी - MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी

Malabar Gold वर ॲडव्हान्स बुकिंगचा फायदा

Malabar Gold देखील मेकिंग charges वर 25% पर्यंत सूट देत आहे. यासोबतच अनकट डायमंड आणि प्रेशियस स्टोन ज्वेलरीवर देखील फ्लॅट 25% ची सूट देण्यात आली आहे. ॲडव्हान्स बुकिंग केल्यास फ्री सिल्व्हर कॉईन देखील दिला जाणार आहे. तुम्ही एकूण किमतीच्या फक्त 10% रक्कम देऊन तुमची ज्वेलरी बुक करू शकता. त्यातून तुम्ही वाढत्या सोन्याच्या किंमतींपासून स्वतःला वाचवू शकता.

ट्रेंडिंग बातमी - Badlapur News:'देवाभाऊ'चष्मा! अवघ्या 33 रुपयांत 140 देशांत जाणार, कोण आहे तो 'व्हिजनमॅन'

Tanishq वर मिळत आहे 20% पर्यंत डिस्काउंट

टाटा समूहाचा ज्वेलरी ब्रँड Tanishq ने 19 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग charges वर 20% पर्यंत सूट दिली आहे. यामध्ये गोल्ड स्टडेड, प्लॅटिनम स्टडेड आणि डायमंड ज्वेलरीचा समावेश आहे.

(नक्की वाचा - MHADA : म्हाडाच्या घरांच्या किमतीचा वाद उच्च न्यायालयात, ग्राहकांची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?)

Paytm वर 'Golden Rush' ऑफर

डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्यांसाठी Paytm ने 'Golden Rush' कॅम्पेन सुरू केले आहे. जर तुम्ही Paytm वरून 500 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी केले तर तुम्हाला 5% रिवॉर्ड पॉइंट मिळतील. टॉप परफॉर्मर 100 ग्रॅम सोन्याच्या बक्षीस  स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

(नक्की वाचा-  Best Bus fare : मुंबईतील प्रवास महागणार, बेस्ट बसच्या भाडेवाढीला BMC ची मंजुरी)

या गोष्टी लक्षात ठेवा

ऑफर्सचा लाभ घेण्यापूर्वी संबंधित ब्रँडच्या वेबसाइट किंवा जवळच्या शोरूममधून नवीनतम तपशील नक्की तपासा. सोन्याची बुकिंग करताना मेकिंग charges आणि इतर नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे सध्याचे दर आणि बाजारातील ट्रेंडवर लक्ष ठेवा.