Gold And Silver Rate Today: गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपूर सराफा बाजारातील 31 January आणि 2 February 2026 च्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
सोन्याच्या दरात मोठी घट
31 January रोजी 1,60,100 रुपये प्रति तोळा (Standard 99.5) असलेले सोने आज 2 February ला 1,51,200 रुपयांवर आले आहे. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 8,900 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, दागिन्यांच्या 22K (916) सोन्याचा दरही 8,300 रुपयांनी कमी होऊन 1,40,600 रुपयांवर स्थिरावला आहे.
चांदीच्या किमतीत 'महा'घसरण
सर्वात मोठा धक्का चांदीच्या किमतीत बसला आहे. 31 January ला 3,05,900 रुपये प्रति किलोवर पोहोचलेली शुद्ध चांदी आता 2,62,600 रुपयांवर आली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 43,300 रुपयांची प्रचंड घसरण झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. दागिन्यांच्या चांदीमध्येही 42,900 रुपयांची घट झाली आहे.
प्लॅटिनम स्थिर
एकीकडे सोने-चांदीचे दर कोसळत असताना प्लॅटिनमचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. प्लॅटिनमचा विक्री दर 90,000 रुपयांवर कायम आहे.
खरेदी आणि विक्री दरातील फरक (As on 2 February 2026):Gold Standard (99.5): विक्री दर 1,51,200 रुपये | खरेदी दर 1,46,700 रुपये
Silver Bullion: विक्री दर 2,62,600 रुपये | खरेदी दर 2,54,700 रुपये
दिनांक: 2 फेब्रुवारी 2026 – वेळ: 10.35 वाजता
नागपूर शहरातील दर
सोन्याचे विक्री दर
- 1,51,200 रुपये : स्टँडर्ड (99.5)
- 1,40,600 रुपये : 22 कॅरेट (916)
- 1,16,400 रुपये : 18 कॅरेट (750)
- 91,500 रुपये : 14 कॅरेट (583)
- 60,500 रुपये : 9 कॅरेट (375)
सोन्याचे खरेदी दर
- 1,46,700 रुपये : स्टँडर्ड (99.5)
- 1,36,400 रुपये : 22 कॅरेट (916)
- 1,12,900 रुपये : 18 कॅरेट (750)
- 87,800 रुपये : 14 कॅरेट (583)
- 57,500 रुपये: 9 कॅरेट (375)
चांदीचे विक्री दर
2,62,600 रुपये : बुलियन, शुद्ध भांडी आणि नाणी/Bar
2,60,000 रुपये : दागिन्यांसाठी
चांदीचे खरेदी दर
2,54,700 रुपये : बुलियन, शुद्ध भांडी व नाणी/बारसाठी
2,52,200 रुपये : दागिन्यांसाठी
प्लॅटिनमचे विक्री दर : 90,000 रुपये
प्लॅटिनमचे खरेदी दर : 85,500 रुपये