Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळत असून सोमवारी दिल्लीत चांदीचे भाव प्रतिकिलो 2.66 लाख रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1.48 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी (Profit Booking) केलेल्या विक्रीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (2 फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात स्पॉट गोल्डमध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर चांदीच्या दरातही मोठी घट दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या सत्रात चांदीने आतापर्यंतची सर्वात मोठी इंट्राडे घसरण नोंदवली होती, जी गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पडझड मानली जात आहे.
डॉलर वधारला, सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला
जागतिक स्तरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे डॉलर वधारला असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे. गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांकी पातळी गाठली होती, पण आता जागतिक तणाव आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील बदलांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. भारतात सोमवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,240 रुपये आणि चांदीचा दर 2,66,500 रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे.
मुंबईत सोन्याचा आजचा दर काय आहे?
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1,47,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्यातही हाच कल असून तिथे सोन्याचा दर 1,47,780 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 1,47,720 रुपये इतका आहे. दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये मात्र सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत थोडे अधिक आहेत. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 1,48,400 रुपयांवर पोहोचला असून हैदराबादमध्ये 1,48,210 रुपये आणि बंगळुरूमध्ये 1,48,090 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने सोने विकले जात आहे.
(नक्की वाचा: Income Tax: आता उत्पन्न लपवलं तर जेल नाही; टॅक्स रिटर्नसाठीही मिळणार जास्त वेळ, वाचा बजेटमधील मोठे निर्णय)
मुंबईत चांदीचा आजचा दर काय आहे ?चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर मुंबईत चांदीचा भाव 2,66,020 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीत चांदी 2,65,560 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये चांदीचे दर सर्वाधिक म्हणजे 2,66,790 रुपये असून हैदराबादमध्ये 2,66,440 रुपये आणि बंगळुरूमध्ये 2,66,230 रुपये प्रति किलो असा दर आहे. कोलकात्यात चांदीचा भाव 2,65,660 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या या चढ-उतारामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांच्याही नजरा आता जागतिक घडामोडींकडे लागल्या आहेत.
शहरानुसार सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई: 1,47,970 रुपये
दिल्ली: 1,47,720 रुपये
बंगळुरू: 1,48,090 रुपये
चेन्नई: 1,48,400 रुपये
हैदराबाद: 1,48,210 रुपये
कोलकाता: 1,47,780 रुपये
शहरानुसार चांदीचे दर (प्रति किलो)
मुंबई: 2,66,020 रुपये
दिल्ली: 2,65,560 रुपये
बंगळुरू: 2,66,230 रुपये
चेन्नई: 2,66,790 रुपये
हैदराबाद: 2,66,440 रुपये
कोलकाता: 2,65,660 रुपये
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world