Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उसळी; एका दिवसात 2000 रुपयांची वाढ

Gold-Silver Rate Today : चांदीच्या दरातही एका दिवसात 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 12 जून रोजी चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 06 हजार 700 रुपये होते. तर हेच दर आज 13 जून रोजी 1 लाख 07 हजार 100 रुपये आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Gold Rate Today : सोन्याचे दराने पुन्हा एकदा लाखांचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी उसळी पाहायला मिळाली असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,00,350 रुपये झाला आहे. इस्रायलने इराणवर केलेला हवाई हल्ला, अमेरिकेला काही देशांनी महत्त्व देणे बंद करणे आणि त्यामुळे होणारे डॉलरचे अवमूल्यन यामुळे सोन्याचे दर वाढल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

सराफा बाजारात सोन्याची दर आज 13 जून रोजी सकाळी 99400 रुपये प्रति तोळे होते. हे दर मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी विना आहेत. हे सर्व शुल्क लागू केल्याची सोन्याचे दर प्रतितोळ एक लाखांच्या  पुढे जात आहेत.   

Advertisement

सोन्याच्या दरात एका दिवसात 2000 रुपयांची वाढ

सोन्याचा दर 12 जून रोजी सकाळी 97400 रुपये प्रति तोळे होती. यानंतर 13 जून रोज सकाळी हे दर 99400 रुपये प्रति तोळे झाले आहेत. भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement

(नक्की वाचा : अबब! 6861% टक्के रिटर्न्स!! या धमाकेदार शेअरमध्ये अजून गुंतवणुकीची संधी आहे ?)

सोन्याच्या शुद्धतेनुसार दर 

  • 24 कॅरेट- 99,400 रुपये प्रति तोळे
  • 22 कॅरेट - 92,400 रुपये प्रति तोळे
  • 18 कॅरेट - 77,500 रुपये प्रति तोळे
  • 14 कॅरेट - 64,600 रुपये प्रति तोळे

चांदीच्या दरातही उसळी

चांदीच्या दरातही एका दिवसात 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 12 जून रोजी चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 06 हजार 700 रुपये होते. तर हेच दर आज 13 जून रोजी 1 लाख 07 हजार 100 रुपये आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  Suzlon Energy News: वाऱ्याच्या वेगाने वाढतेय या शेअरची किंमत, 2000 % रिटर्न्स, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ?)

भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढणार

इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे, ज्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा भारत-पाकिस्तान मुद्दा असो, विविध देशांकडून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना बाजूला केले जात असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. टॅरिफ वॉरमध्येही चीनने अमेरिकेला बाजूला केले आहे, ज्यामुळे भू-राजकीय तणावात सतत वाढ होत आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे. जर सोन्याच्या किमतीत अचानक वाढ झाली तर ते आश्चर्यकारक ठरणार नाही. अलिकडच्या काळात दिसून आल्याप्रमाणे भविष्यात हे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी वर्तवला आहे.

नरेश ज्वेल्सचे प्रमुख नरेश जैन यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले की मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 1 लाख 2 हजार 500 रुपये इतका होता. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 1,05,000 ते 1,10,000 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे जैन यांनी सांगितले.


 

Topics mentioned in this article