
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ITR-1 पासून ITR-7पर्यंत सर्व सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म्स जारी केले आहेत. याशिवाय Income Tax Department ने ITR-V फॉर्म देखील जारी केला आहे. याशिवाय आयकर विभागाने आणखी एक नवा फॉर्म जारी केला आहे. ITR-U हा नवा फॉर्म 19 मे रोजी जारी करण्यात आला. या फॉर्मद्वारे आयकर भरणा करणाऱ्यांना गेल्या 48 महिन्यांचे ITR फाइल करण्याची मुभा मिळेल. या फॉर्मद्वारे ITR मध्ये सुधारणाही करता येतील. नव्या वित्त कायद्याअंतर्गत ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) सादर केले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने 31 जुलै, 2025 रोजी अथवा त्यापूर्वी ITR सादर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. साहजिकच आहे यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी किंवा असेसमेंट इयर 2025-26 (AY 2025-26) साठी रिटर्न सादर करण्याची मुदत वाढवून 15 सप्टेंबर 2025 करण्याचा निर्णय घेतला आहे.
15 सप्टेंबरची मुदत चुकल्यास काय होईल ?
एखाद्या करदात्याला कोणत्याही अडचणीमुळे 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी रिटर्न फाइल करता आले नाही तरीही काळजी करण्याची गरज नाही. 15 सप्टेंबरनंतरही करदात्यांना रिटर्न फाइल करता येईल मात्र त्यासाठी विलंब शुल्क द्यावे लागेल. विलंब शुल्कासह 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न फाइल करण्यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असणार आहे.
नक्की वाचा : Radico Khaitan च्या शेअरबाबत MO चे भाकीत
जून महिन्यात गेल्या वर्षीच्या आयकर परताव्याचे फॉर्म जारी होत असतात. तेव्हापासून दीड महिना म्हणजे 31 जुलै पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयकर परतावा सादर करण्यासाठी मुदत असते. पण यंदा नव्या ITR फॉर्ममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.त्यासाठी आयकर विभागाच्या सूचनेनुसार संगणकीय व्यवस्थेत काही बदल करावे लागणार आहे. हे आवश्यक बदल करण्यासाठी काही वेळ लागणार आहे. हा अवधी विचारात घेता प्रत्यक्ष कर विभागाने मंगळवारी एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. यात आयकर परताव्याची मुदत यंदा 15 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world