शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजारातील मागील 8 दिवसांपासून घसरणीचा सिलसिला आजही कामय आहे. सुरुवातीच्या ट्रेडमध्ये दमदार सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख इंडेक्समध्ये पडझड पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा देखील शेअर बाजारावर परिणाम दिसला नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुपारच्या सुमारास सेन्सेक्समध्ये जवळपास 550 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीमध्ये देखील 188 अंकांची पडझड पाहायला मिळाली. एकवेळ सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाण्यावर ट्रेड करत होते.
नक्की वाचा - AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं
शेअर बाजार घसरणीची कारणे?
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफने शेअर बाजाराच्या खराब सेन्टिमेंट्सना आणखी खराब केले.
- FIIs कडून सुरु असलेली विक्री सुरुच आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली आहे.
- HNIs कडून विक्री सुरुच आहे.
- मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये ट्रेडर्सना मार्जिन कॉल ट्रिगर होण्याची भीती आहे.
- मिडकॅप, स्मॉलकॅप कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उच्च मूल्यांकनात आत्मविश्वास निर्माण करू शकले नाहीत.
- अनेक छोटे गुंतवणूक तोट्यात शेअरची विक्री करत आहेत.
(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)
शेअर बाजारात 2025 पासून विक्रमी घसरण
2025 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 2.6 टक्के घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 12 टक्के आणि 15 टक्के घसरले आहेत. शेअर बाजाराचं मार्केट कॅप 4 डिसेंबर 2023 नंतर सर्वात कमी आहे. जे डिसेंबरच्या मध्यावर 5.14 ट्रिलियनवर पोहोचलं होतं. भारतील रुपया देखील डॉलरच्या तुलनेत 1.5 टक्के घसरला आहे.