आता काही दिवसांमध्येच नोव्हेंबर महिना सुरु होत आहे. 1 नोव्हेंबपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. त्यामध्ये एलपीजी गॅसचे दर, क्रेडिट कार्डचे नियम, बँक सुट्ट्यांची यादी, यांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारे 5 मोठे बदल कोणते ते पाहूया
LPG, CNG, PNG दरांमध्ये बदल
एक नोव्हेंबरपासून LPG, CNG, PNG दरामध्ये बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपनी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल करते. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर 48.5 रुपये वाढले होते. गेल्या तीन महिन्यांपासून हे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे यंदा 14 किलोचे LPG सिलेंडर स्वस्त होईल, अशी आशा आहे. 19 किलो व्यावसायिक सिलेंडर्सच्या दरात जुलैमध्ये घट करण्यात आली होती. त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये त्याची किंमतही 20 रुपयांनी वाढली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये CNG आणि PNG दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे 1 नोव्हेंबरला ऑईल कंपन्यांकडून याचे नवे दर जाहीर केली जातील, अशी शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
SBI च्या क्रेडिट नियमांमध्ये बदल
देशातील प्रमुख सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट नियमांमध्येही बदल होणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून असुरक्षित एसबीआय क्रेडिट कार्टवर 3.75 टक्के अतिरिक्त आर्थिक शुल्क लागू होईल. त्याचबरोबर वीज. पाणी, एलपीजी गॅससह अन्य उपयोगी सेवांवर 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले तर एक टक्के अतिरिक्त चार्ज भरावा लागेल.
बँका किती दिवस बंद ?
नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण 13 दिवस बंद आहेत. सण, सार्वजनिक सुट्टी तसंच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा विचार करुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. अर्थात या काळात ऑनलाईन सर्व्हिस सुरु असतील. तुम्हाला कोणती आवश्यक कामं असतील तर तुम्ही त्याचा वापर करुन व्यवहार करु शकता.
( नक्की वाचा : Bank Holidays 2024: दिवाळीत बँक कधी बंद असणार? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? दूर करा संभ्रम )
Mutual Fund च्या नियमांमध्ये बदल
एक नोव्हेंबरपासून Mutual Fund च्या नियमांमध्ये बदल होत आहेत. Securities and Exchange Board of India म्हणजेच SEBI नं इनसायडर नियामांना अधिक कठोर करण्याचा प्रयत्न केला आहे. या बदलानुसार अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजेच AMCs चे नॉमिनी तसंच नातेवाईकांना 15 लाखांपेक्षा जास्तीच्या व्यवहारांची माहिती देणे अनिवार्य आहे.
TRAI च्या नियमांमध्ये बदल
एक नोव्हेंबरपासून ट्रायच्या नियमामंमध्ये बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम जियो, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनलच्या युझर्सवर होणार आहे. TRAI नं सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना 1 नोव्हेंबरपासून मेसेट ट्रेसिबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या सर्व मेसेजचा मागोवा घेणे शक्य आहे. सर्व प्रकारचे फर्जी कॉल तसंच मेसेज थांबवण्याची नवी पद्धत असेल. त्यामुळे फसवणुकीच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. अर्थात याचा काही तोटा देखील आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ओटीपी मिळायला उशीर होऊ शकतो. त्याचा सर्वात मोठा फटका ऑनलाईन पेमेंट करताना होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world