
Cyber Fraud Money Recovery Tips: अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून, डिजिटल अरेस्ट, स्वस्तात वस्तू देण्याच्या बहाण्याने अनेकांची कोट्यावधींची फसवणूक होते. या सायबर क्राईममध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपये गमावल्याचेही प्रकार घडले आहेत. एकदा सायबर फ्रॉडमध्ये पैसा गेला की ते परत येण्याची शक्यता फार कमी असते किंवा मिळतच नाही अशी अनेकांची समजूत आहे. मात्र सायबर फ्रॉडमध्ये गमावलेला पैसाही परत मिळवता येतो. याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. जाणून घ्या...
सायबर क्राईम बद्दल जनजागृती करणारे भारतीय समाजाला सायबर क्राईम मुक्त ठेवण्यासाठी कार्यरत असणारे सायबर क्राईम विशतज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले पैसे परत कसे मिळवाल? याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सायबर क्राईममध्ये गमावलेले पैसे मिळवण्यासाठी तुमची तत्परता सर्वात महत्त्वाची असते. तुम्ही तातडीने सायबर एक्सपर्टला गाठले तर पैसे पुन्हा मिळवता येतात असं त्यांनी सांगितले आहे.
गमावलेले पैसे परत कसे मिळवाल?
सायबर फ्रॉडमध्ये फसलेले लोक नंतर पॅनिक होतात, कारण त्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत हवे असतात. पण ते लोक हे विसरतात की, तुम्ही दहा पाच मिनिटात किंवा फार तर एक तासात लाखो रुपये घालवून बसता आणि पैसे गेल्यावर मात्र सायबरवाल्यानी ते लगेच रिकव्हर करावेत असा नूर असतो. पैसे रिकव्हर होऊ पण शकतात पण त्यालाही काही नियम अटी आहेत. पैसे गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत सायबर एक्सपर्टला गाठले तर रिकव्हरीचे चान्सेस बरेच असतात. आणि जसजसा तो वेळ वाढतो तसतसे चान्सेस कमी होतात. मात्र तुम्ही त्वरित ऍक्शन घेतली तर बऱ्यापैकी पैसे रिकव्हर होतात, असं डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी सांगितले आहे.
याबाबतचा एक पुरावाही दाखला म्हणून त्यांनी आपल्या फेसबुक अकांउंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सायबर फ्रॉडच्या जाळ्यात अडकलेल्या एका महिलेसोबतचे संभाषण शेअर केले आहे. या महिलेचे तब्बल 28 लाख सायबर फ्रॉडमध्ये गेले. मात्र त्यांनी तातडीने दखल घेतल्याने त्यांचे 25 लाख रुपये पुन्हा मिळवता आले. या महिलेने डॉ. देशपांडे यांचे आभारही मानले आहेत.
Sangli Crime: अरेरे! नोटांच्या बंडलात कागदाचे तुकडे, सांगलीच्या व्यापाऱ्याला 50 लाखांचा चुना
दरम्यान, ज्यांचे पैसे गेलेत किंवा धोक्यात आहेत त्यांनी त्वरित योग्य त्या अधिकारी अथवा सायबर एक्सपर्टशी संपर्क केला तर चान्सेस पॉजिटीव्ह असतात. तुम्ही पैसे गेल्यावर किती कमीत कमी वेळेत आमच्यापर्यँत येता त्यावर सगळं अवलंबून आहे. असे सांगत अशाप्रकारच्या सायबर फ्रॉडपासून लांब राहण्याचा, कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world