SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन 

Mutual Fund SIP Investment: म्युच्युअल फंड्सचे हाय रीटर्न्स  किंवा सोन्यातील गुंतवणूक, यापैकी तुम्ही कोणताही मार्ग निवडताय? 10 वर्षात कोट्यधीश व्हायचे असेल तर या लेखाद्वारे गणित समजून घ्या.  

जाहिरात
Read Time: 3 mins
SIP Return Calculator: म्युच्युअल फंड जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते, पण त्याची हमी नसते.

Mutual Fund SIP investment: भारतामध्ये कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मंडळींची संख्या भलीमोठी आहे. हे केवळ आर्थिक स्थिरतेचे ध्येय नाहीय तर निवृत्तीनंतर जीवन आणि भविष्यातील सुरक्षिततेचे एक प्रमुख ध्येय देखील मानले जाते. योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूकीसह तुम्ही कोट्यधीश होण्याचे स्वप्न 10 वर्षांत पूर्ण करू शकता. 

10 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी हा हाय-रिस्क इन्वेस्टमेंटसाठी एक बॅलेन्स्ड कालावधी मानला जातो. यादरम्यान बाजारातील चढउतारांचा परिणाम संतुलितरित्या होतो आणि कम्पाउंडिंगचे फायदे गुंतवणूकदारांना दीर्घकाळात चांगले रीटर्न्स देऊ शकतात. म्हणूनच म्युच्युअल फंड SIP आणि सोने यासारख्या पर्यायांवर लक्ष केंद्रित केले जाते. 

केवळ बचत करणं पुरेसे नाहीय 

पैशांची केवळ बचत करणं पुरेसे नाहीय. तुमचे लक्ष्य 10 वर्षात एक कोटी रुपये उभारण्याचे असेल तर गुंतवणूक प्रक्रिया थोडी आक्रमक असायला हवी. यामध्ये हाय रीटर्न्स मिळणाऱ्या शक्यतांचे पर्याय, कम्पाउंडिंगचा योग्य वापर आणि पोर्टफोलियोतील विविधता महत्त्वाची भूमिका निभावतात. मोठे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्टेप-अप SIP अतिशय महत्त्वाची मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदार दरवर्षी आपल्या एसआयपी रक्कमेत वाढ करतात, सहसा उत्पन्नात वाढत झाल्यानंतर हे पाऊल उचलले जाते. यामुळे गुंतवणूक हळूहळू वाढू शकते आणि आर्थिक ताण टाळता येतो.

म्युचुअल फंडद्वारे एक कोटी रुपयांची रक्कम कशी उभारावी? 

- जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड SIPद्वारे दरमहा 30 हजार रुपये गुंतवले आणि त्याचे उत्पन्न वाढत असताना दरवर्षी ही गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढवली तर 10 वर्षांच्या कालावधीत चांगले रीटर्न्स मिळू शकतात. 

- जर या संपूर्ण गुंतवणुकीचा सरासरी वार्षिक परतावा 12 टक्के राहिला तर 10 वर्षांतील एकूण गुंतवणूक सुमारे 57 लाख 37 हजार 472 रुपये होते.

- या रक्कमेवरील अंदाजे रीटर्न्स जवळपास अंदाजे 43 लाख 85 हजार 505 रुपये इतके असेल, ज्यानुसार एकूण निधी मूल्य सुमारे 1 कोटी 01 लाख 22 हजार 978 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.  

सोन्यातील गुंतवणुकीद्वारे 1 कोटी रुपयांचे लक्ष्य कसे पूर्ण करता येईल? 

- एखाद्या गुंतवणूकदाराने सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि दरमहा सुमारे 33 हजार रुपये गुंतवले, दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम 10 टक्क्यांनी वाढवली, तर 10 वर्षांत एक मजबूत निधी रक्कम उभारली जाऊ शकते. 

- या हिशेबानुसार जर सोन्यावर सरासरी 10 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरला तर एकूण गुंतवणूक अंदाजे 63 लाख 11 हजार 220  रुपये इतके होईल.

- यावरील मिळणारे अंदाजे रीटर्न जवळपास 37 लाख 40 हजार 091 रुपयांपर्यंत पोहोचेल आणि एकूण निधी मूल्य जवळपास 1 कोटी 51 हजार 311 रुपयांपर्यंत पोहोचेल. 

(नक्की वाचा: Home Loan News : पगारदार वर्गासाठी सुवर्णसंधी! 'या' योजनेत मिळतेय बँकेपेक्षाही स्वस्त गृहकर्ज; वाचा डिटेल्स)

म्युच्युअल फंड Vs सोने

हिशेबानुसार म्युच्युअल फंडद्वारे जास्त परतावा मिळवण्याची शक्यता आहे, पण याची पूर्ण हमी नाही. दुसरीकडे सोने काही आर्थिक चक्रांमध्ये चांगली कामगिरी करते, विशेषतः जेव्हा जागतिक अनिश्चितता किंवा भू-राजकीय तणाव वाढतो. दोन्ही पर्याय वेगवेगळ्या परिस्थितीत फायदेशीर ठरू शकतात. एकूणच योग्य एसआयपी, स्टेप-अप स्ट्रॅटेजी आणि संयमी गुंतवणुकीसह कोट्यधीश होण्याचे स्वप्न 10 वर्षांत प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकते. 

Advertisement

(नक्की वाचा: अदाणी ग्रीन एनर्जीचा खूप मोठा निर्णय, 'TNFD' आराखडा स्वीकारणार; प्रकल्पस्थळी 2 कोटींहून अधिक झाडे लावण्याचा मानस)

गुंतवणूकदारांचा सल्ला

10 वर्षांत कोट्यधीश होण्याचे लक्ष्य नक्कीच मोठे आहे, पण अशक्य मुळीच नाही. पण गुंतवणूकीपूर्वी सावधगिरी बाळगणं आणि जोखीम समजून घेणे आवश्यक आहे. 

नोट- बाजाराशी संबंधित गुंतवणूकीत चढ-उतार होत असतात आणि शॉर्ट टर्ममध्येही नुकसान होऊ शकते. चांगल्या परिणामांसाठी गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीचे नियोजन करावे आणि आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Advertisement