जाहिरात
Story ProgressBack

'म्युच्युअल फंडांनी स्मॉल-मिडकॅप योजनांमधील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवावे', SEBI नं का दिला हा सल्ला?

SEBI ने म्युच्युअल फंडांना भारतीय इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याची सूचना दिली असून त्याबाबत एक खास पत्र लिहलंय.

Read Time: 3 min
'म्युच्युअल फंडांनी स्मॉल-मिडकॅप योजनांमधील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवावे', SEBI नं का दिला हा सल्ला?
मुंबई:

गुंतवणूक काढून घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे 'फर्स्ट-मूव्हर ॲडव्हान्ट'च्या प्रभावापासून संरक्षण होईल याबाबत आश्वस्त करण्यासाठी म्युच्युअल फंड विश्वस्तांना पावले उचलण्यासचे निर्देश सेबीनं (SEBI) दिले आहेत.

SEBI ने म्युच्युअल फंडांना भारतीय इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याची सूचना दिली असून त्याबाबत एक खास पत्र लिहलंय.

पत्रातील मजकूर काय?

 म्युच्युअल फंडाच्या इंडस्ट्री बॉडी असलेल्या AMFI ने म्युच्युअल फंड विश्वस्तांना पाठवलेल्या अंतर्गत पत्रानुसार, काही पावले उचलण्यास सांगितली आहेत, ज्यामध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि निधी व्यवस्थापकांना फ्लो नियंत्रित करण्यास आणि पोर्टफोलिओमध्ये पुन्हा एकदा संतुलन आणण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. हे पत्र सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, मात्र 'NDTV प्रॉफिट'ने हे पत्र वाचले आहे. 

गुंतवणूक काढून घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे 'फर्स्ट-मूव्हर ॲडव्हान्ट'च्या प्रभावापासून संरक्षण होईल याबाबत आश्वस्त करण्यासाठी म्युच्युअल फंड विश्वस्तांना पावले उचलण्यास सांगितले आहे.

पत्रानुसार,मार्केट रेग्युलेटरने म्युच्युअल फंडांना बाजारातील स्मॉल आणि मिडकॅप सेगमेंटमध्ये 'फोम' निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी आणि म्युच्युअल फंडांच्या मिड आणि स्मॉलकॅप योजनांमध्ये सततचा फ्लो सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.
2023 च्या सुरुवातीपासूनच किरकोळ गुंतवणूकदार मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांकडे आकर्षित झाले आहेत, अशा योजनांनी त्या कालावधीत प्रचंड परतावा दिला आहे.

AMFI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षाच्या जानेवारीपर्यंत सक्रियपणे व्यवस्थापित स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये 37,360 कोटी रुपये आणि मिड-कॅप योजनांमध्ये 19,400 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.


काही म्युच्युअल फंडांनी गेल्या काही महिन्यांत,विशेषत: स्मॉल-कॅप योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा फ्लो पाहता आधीच कारवाई केली आहे.निप्पॉन म्युच्युअल फंड, जे व्यवस्थापनाखालील मालमत्तेनुसार सर्वात मोठी स्मॉल-कॅप योजना चालवते आणि टाटा म्युच्युअल फंड यांनी त्यांच्या योजनांमध्ये एकरकमी आवक थांबवली आहे.

रिडेम्प्शन प्रेशरच्या प्रभावापासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याच्या मुद्द्यावर, एका मोठ्या म्युच्युअल फंडाचे प्रमुख, नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, 'सर्व गुंतवणूकदारांशी न्याय्यपणे वागण्याची जबाबदारी AMC वर टाकण्याचा विचार आहे. SEBI ला फंड रिडेम्प्शनसाठी बाजारात दर्जेदार शेअर्स विकले जावेत आणि म्युच्युअल फंडांकडे अलिक्विड पोर्टफोलिओ शिल्लक राहावे असे वाटत नाही. आम्ही रिडेम्प्शनवर कोणती मर्यादा लादू असा  याचा अर्थ असा नाही

मालमत्ता वाटपाकडे द्या लक्ष

क्रेडेन्स वेल्थचे संस्थापक आणि सीईओ कीर्तन शाह म्हणाले,'मूल्यांकनातील वाढ मिड आणि स्मॉल-कॅप क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामध्ये नैसर्गिक पुनर्संतुलन असू शकते. ज्या गुंतवणूकदारांनी या विभागातील त्यांच्या वाटपामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, मात्र ज्या गुंतवणूकदारांनी योग्य मालमत्ता वाटप धोरण अवलंबले आहे त्यांनी फार काळजी करण्याची गरज नाही. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम उचलण्याच्या क्षमतेवर आधारित आपले मालमत्ता वाटप धोरण ओळखले पाहिजे. पुढे ते असं म्हणाले की याचा अर्थ किती तोटा सहन करण्याची क्षमता आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination