नागपूरच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोन्याचा विक्री दर प्रति तोळा (99.5 स्टँडर्ड) 1,54,600 रुपये होता, तो आज 17 फेब्रुवारी रोजी 600 रुपयांनी कमी होऊन 1,54,000 रुपयांवर पोहोचला आहे. याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दरही 1,43,800 रुपयांवरून 1,43,200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. 18 कॅरेट, 14 कॅरेट आणि 9 कॅरेट सोन्याच्या विक्री दरातही आज घट झाल्याचे दिसून येत आहे. खरेदी दराचा विचार करता, कालच्या 1,50,000 रुपयांच्या तुलनेत आज स्टँडर्ड सोन्याचा खरेदी दर 1,49,400 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
नक्की वाचा: नोकरदारांची दिवाळी! एप्रिलपासून खिशात येणार जास्तीची सॅलरी, असे आहे नवे गणित
सोन्याचे दर घसरले, चांदीचे दर वधारले
सोन्याचे दर कमी झाले असले तरी चांदीच्या दरात मात्र तेजी दिसून आली आहे. सोमवारी शुद्ध चांदीचा विक्री दर 2,39,800 रुपये प्रति किलो होता, तो आज 700 रुपयांनी वाढून 2,40,500 रुपयांवर पोहोचला आहे. दागदागिन्यांसाठी लागणाऱ्या चांदीच्या दरातही वाढ झाली असून तो 2,38,100 रुपये प्रति किलो झाला आहे. प्लॅटिनमच्या दरात मात्र कोणतीही हालचाल झालेली नाही. प्लॅटिनमचा विक्री दर आजही 90,000 रुपये आणि खरेदी दर 85,500 रुपये असा स्थिर आहे. ग्राहकांसाठी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या दराव्यतिरिक्त मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि GST अतिरिक्त लागू असेल, तसेच मेकिंग चार्जेस किमान 13 टक्क्यांपासून पुढे असतील.
नक्की वाचा: पदवीधरांना RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
काय आहेत सोनं,चांदीचे खरेदी आणि विक्रीचे आजचे दर?
नागपूरमधील सराफा बाजाराततर्फे मिळालेल्या माहितीनुसार सोनं आणि चांदीचे 17 फेब्रुवारी रोजी सकाळचे दर खालीलप्रमाणे आहेत.
Gold, Silver & Platinum Rate
As on February 17th, 2026 - Time 10.18 Hrs
Recommended Rate for Nagpur Sarafa:
Gold Sale Rate
1,54,000 : Standard (99.5)
1,43,200 : 22K (916)
1,18,600 : 18K (750)
93,200 : 14K (583)
61,600 : 9K (375)
Gold Purchase Rate
1,49,400 : Standard (99.5)
1,38,900 : 22K (916)
1,15,000 : 18K (750)
89,500 : 14K (583)
58,500 : 9K (375)
Silver Sale Rate
2,40,500 : for Bullion and Pure Utensils and Coin/Bar
2,38,100: for Jewellery
Silver Purchase Rate
2,33,300 : for Bullion and Pure Utensils and Coin/Bar
2,31,000 : for Jewellery
Platinum Sale Rate
90,000
Platinum Purchase Rate
85,500
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world