RBI Assistant Notification: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'सहाय्यक' (Assistant) पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागा देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयांमधील असून त्या भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा (RBI Assistant Recruitment Exam) घेतली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी केवळ आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून (www.rbi.org.in) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. इतर कोणत्याही माध्यमांतून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नक्की वाचा: मोदी- मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा! 13 तास वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गावर प्रवेश बंदी
RBI भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी: 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026
- परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026
- ऑनलाईन पूर्व परीक्षा (अंदाजे): 11 एप्रिल 2026
- ऑनलाईन मुख्य परीक्षा (अंदाजे): 7 जून 2026
गरज पडल्यास परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याचे सगळे अधिकार रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे ठेवले आहेत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कोणकोणत्या शहरांतील रिक्त जागा भरल्या जाणार ? (RBI Assistant Recruitment Vacant Posts)
अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर आणि लखनऊ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम अशा विविध कार्यालयांमध्ये 650 जागा भरल्या जातील. गरजेनुसार या जागांच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारासाठी कोणते निकष असतील (RBI Assistant Recruitment Eligibility Criteria)
उमेदवार भारताचा नागरिक असावा. नेपाळ किंवा भूतानमधील नागरिक, 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित किंवा भारतीय वंशाचे नागरिक ज्यांचे भारतात कायमस्वरूपी राहण्याचे उद्दिष्ट आहे, ते देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत (त्यांच्याकडे भारत सरकारचे पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे).
नक्की वाचा: गॅस टँकर अपघातानंतर वसूल केलेला टोल परत मिळणार? कंपनीने काय सांगितलं?
उमेदवारासाठी वयोमर्यादा काय आहे (RBI Assistant Recruitment Age Criteria)
उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असावे तर कमाल वय 28 वर्षांपर्यंत असावे. (उमेदवाराचा जन्म 2 फेब्रुवारी 1998 ते 1 फेब्रुवारी 2006 या दरम्यान झालेला असावा.)
वयात सवलत
- अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST): 5 वर्षे सवलत.
- इतर मागासवर्गीय (OBC): 3 वर्षे सवलत.
- दिव्यांग (PwBD): 10 ते 15 वर्षे सवलत.
- माजी सैनिक: नियमांनुसार अतिरिक्त सवलत.
- विधवा/घटस्फोटित महिला: 35 ते 40 वर्षांपर्यंत (वर्गाप्रमाणे).
- आरबीआय कर्मचारी: सेवेच्या वर्षांनुसार सवलत (कमाल 3 वर्षे).
शैक्षणिक पात्रता (RBI Assistant Recruitment Age Criteria)
- किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी आवश्यक).
- संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असावे.
- ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात, तिथली प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता, बोलता आणि समजता येणे अनिवार्य आहे.
- 15 वर्षांची संरक्षण सेवा पूर्ण केलेल्या माजी सैनिकांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल? (RBI Assistant Recruitment Selection Process)
उमेदवारांची निवड 3 टप्प्यांत केली जाईल
- पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
- मुख्य परीक्षा (Main Exam)
- भाषा प्राविण्य चाचणी (LPT)
ज्या राज्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा तुम्हाला येते की नाही हे पाहण्यासाठी ही चाचणी घेतली जाईल. यात अनुत्तीर्ण झाल्यास अपात्र ठरवले जाईल.
परीक्षेचे स्वरूप कसे असेल ? (RBI Assistant Recruitment Exam)
- पूर्व परीक्षा: इंग्रजी (30 प्रश्न), गणित (35 प्रश्न) आणि बुद्धिमत्ता (35 प्रश्न). एकूण 100 प्रश्न, 100 गुण, वेळ 60 मिनिटे.
- मुख्य परीक्षा: बुद्धिमत्ता, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञान या प्रत्येकी विषयांचे 40 प्रश्न (एकूण 200 प्रश्न, 200 गुण).
(दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.)
अर्ज शुल्क (RBI Assistant Recruitment Exam Fee)
- General आणि OBC: Rs 450
- SC/ST/PwBD/माजी सैनिक आणि RBI कर्मचारी: Rs 50
हे शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world