
NDTV Profit IGNITE : दिव्यांचा उत्सव आणि संवत् 2082 च्या सुरुवातीला, NDTV प्रॉफिट (NDTV Profit) आपला प्रमुख विचार-नेतृत्व (thought leadership) प्लॅटफॉर्म 'IGNITE' च्या विशेष दिवाळी एडिशनसह सज्ज झाले आहे.
'IGNITE' हे त्याच्या नावाप्रमाणेच, चर्चांना स्फूर्ती देण्यासाठी, नवनवीन कल्पनांना प्रकाशित करण्यासाठी आणि संधींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या व्यासपीठावर अर्थ, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती एकत्र येऊन आपले दृष्टिकोन मांडतात आणि भविष्याला आकार देतात.
दिग्गज सहभागी होणार
NDTV प्रॉफिट 'IGNITE' आशावाद आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारांसह नवीन वर्षाची सुरुवात करत आहे. यात भारतातील आर्थिक आणि कॉर्पोरेट जगताला नवी दिशा देणाऱ्या दूरदर्शी नेत्यांचा सहभाग असेल.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये हे दिग्गज असतील
मनीष चोखानी (Manish Chokhani), दिग्गज गुंतवणूकदार आणि संचालक, एनाम होल्डिंग्स (Enam Holdings)
रमेश दमानी (Ramesh Damani), व्हॅल्यू गुंतवणूकदार आणि सदस्य, बीएसई (BSE)
निलेश शहा (Nilesh Shah), एमडी, कोटक महिंद्रा एएमसी (Kotak Mahindra AMC)
आशिषकुमार चौहान (Ashishkumar Chauhan), एमडी आणि सीईओ, एनएसई (NSE)
निमेष शहा (Nimesh Shah), एमडी आणि सीईओ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी (ICICI Prudential AMC)
सुंदीप सिक्का (Sundeep Sikka), ईडी आणि सीईओ, निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट (Nippon Life India Asset Management)
विजय केडिया (Vijay Kedia), व्यक्तिगत गुंतवणूकदार
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), अभिनेता आणि व्यावसायिक
आयुष मित्तल (Ayush Mittal) आणि प्रत्युष मित्तल (Pratyush Mittal), संस्थापक, स्क्रीनर एआय (Screener AI)
सुमंत चंदा (Sumit Chanda), सीईओ आणि संस्थापक, जार्विस इन्व्हेस्ट (Jarvis Invest)
ज्योती स्वरूप (Jyoti Swarup), सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड – बिझनेस डेव्हलपर, ॲक्सिस मॅक्स लाईफ (Axis Max Life)
यशोवर्धन सिन्हा (Yashovardhan Sinha), अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आदित्य व्हिजन लिमिटेड (Aditya Vision Ltd)
रुमित दुग्गर (Rumit Duggar), सीएफओ, ब्लूस्टोन (Bluestone)
मयंक शहा (Mayank Shah), व्हाईस प्रेसिडेंट, पारले प्रॉडक्ट्स प्रा. लि. (Parle Products Pvt Ltd)
प्रमुख चर्चांचे विषय
फायरसाइड चॅट्स, पॅनेल चर्चा आणि वन-ऑन-वन संवादातून या कार्यक्रमात भारताच्या आर्थिक आणि कॉर्पोरेट भविष्याला आकार देणाऱ्या गंभीर विषयांवर मंथन होईल.
चर्चेतील मुख्य विषय असे असतील:
बाजारातील धोरणांचा विकास (Evolution of Market Strategies)
ट्रेडिंगमधील एआयची (AI) परिवर्तनकारी भूमिका
निवृत्ती नियोजन (Retirement Planning) आणि एसआयपी (SIPs) द्वारे संपत्ती निर्माण
जीएसटी (GST) मुळे चालना मिळालेली उपभोग वाढ (Consumption Growth)
पैसा आणि बाजारपेठेचा परस्परसंबंध (Interplay of Money and the Markets)
नेतृत्वाचा दृष्टिकोन
NDTV चे सीईओ आणि एडिटर-इन-चीफ राहुल कंवल (Rahul Kanwal) म्हणाले, ‘दिवाळी हा प्रकाश, नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीचा उत्सव आहे. IGNITE मध्येही तोच उत्साह आहे – भारताने संवत् 2082 मध्ये पदार्पण करताना कल्पना, दृष्टिकोन आणि नवनिर्मिती एकत्र आणणे हा आमचा उद्देश आहे. व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांसाठी बदलांना प्रेरणा देणारे, सहकार्याला प्रोत्साहन देणारे आणि विकासाचे मार्ग प्रकाशित करणारे संवाद साधण्याचे आमचे लक्ष्य आहे.'
NDTV चे रेव्हेन्यू हेड-नेटवर्क टीव्ही मनदीप सिंग (Mandeep Singh) यांनी सांगितलं की, ‘IGNITE हे असे व्यासपीठ आहे जिथे धोरण आणि उत्सव एकत्र येतात. हा उपक्रम बाजारपेठा, कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांमध्ये समन्वय साधून संवत् 2082 मध्ये प्रभावी ठरतील अशा संधी निर्माण करण्यावर भर देईल. NDTV प्रॉफिटसाठी, हे सर्व क्षेत्रांमध्ये विकास जोडण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world