New Rules June 2026 : 1 जून 2026 पासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित 7 मोठे बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर आणि आर्थिक नियोजनावर होईल.
यूपीआय पेमेंटमध्ये मोठा बदल
NPCI आता यूपीआय फसवणूक पूर्णपणे थांबवण्याच्या तयारीत आहे. आता कोणालाही पैसे पाठवताना तुम्हाला त्यांचे बँकेत नोंदणीकृत असलेले 'खरे नाव' दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका राहणार नाही.
LPG सिलिंडरच्या नव्या किमती
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसच्या दरांचा आढावा घेतात. इराणमधील तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : 26 Lakh Jobs: नोकरी जाणार अशी भीती वाटतेय? 'या' क्षेत्रात 26 लाख जागांची प्रतीक्षा; कुठे आहे संधी,वाचा सविस्तर )
पॅन कार्डचे नियम बदलले
50,000 रुपयांपर्यंतची रोख रक्कम जमा करण्यासाठी आता पॅन कार्डची गरज भासणार नाही. मात्र, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रॉपर्टी व्यवहार आणि गिफ्ट डीडसाठी पॅन अनिवार्य असेल.
एटीएममधून पैसे काढणे महागणार
अनेक बँका जूनपासून एटीएम व्यवहारांच्या शुल्कात बदल करत आहेत. मोफत मर्यादा संपल्यानंतर पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स चेक करणे आता महाग होऊ शकते.
( नक्की वाचा : 8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग आणणार पगारवाढीची लाट, 400 टक्के पगार वाढणार? वाचा सर्व अपडेट )
रेल्वेचे मार्ग आणि गाड्यांमध्ये बदल
ट्रॅक अपग्रेडच्या कामामुळे रेल्वेने जवळपास 77 गाड्या रद्द केल्या असून अनेकांचे मार्ग बदलले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये याचा मोठा परिणाम दिसेल.
सोलर पॅनेलसाठी नवे नियम
'सूर्य घर योजने'साठी आता केवळ सरकारने मान्यता दिलेल्या (ALMM लिस्ट) सोलर पॅनेलचाच वापर करता येईल. यामुळे पॅनेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
एफडीच्या व्याजदरात बदल
अनेक बँका आपल्या मुदत ठेव (FD) योजनांचे व्याजदर बदलत आहेत. आरबीआयच्या धोरणांनुसार काही जुन्या योजना बंद होऊन नव्या दरांच्या योजना सुरू होऊ शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world