जाहिरात

26 Lakh Jobs: नोकरी जाणार अशी भीती वाटतेय? 'या' क्षेत्रात 26 लाख जागांची प्रतीक्षा; कुठे आहे संधी,वाचा सविस्तर

Job Opportunities: भारतामध्ये एक असे क्षेत्र उदयाला येत आहे, जे येणाऱ्या काळात रोजगाराचा महासागर ठरू शकते.

26 Lakh Jobs: नोकरी जाणार अशी भीती वाटतेय? 'या' क्षेत्रात 26 लाख जागांची प्रतीक्षा; कुठे आहे संधी,वाचा सविस्तर
Job Opportunities: हे क्षेत्र अर्थव्यवस्थेला नवा आधार देण्याचे काम करेल.
मुंबई:

26 Lakh Jobs: सध्या जगभरात मंदीचे सावट दाट होताना दिसत असून मोठ्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. नोकऱ्या जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता एक अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी आहे. भारतामध्ये एक असे क्षेत्र उदयाला येत आहे, जे येणाऱ्या काळात रोजगाराचा महासागर ठरू शकते.

कचऱ्यातून उभी राहणार 51 बिलियन डॉलर्सची बाजारपेठ

देशातील शहरांमध्ये साचलेले कचऱ्याचे डोंगर ही आता केवळ समस्या राहिलेली नसून, ती एक मोठी आर्थिक संधी बनली आहे. कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) च्या नव्या अभ्यासानुसार, आपल्या घरातील ओला कचरा, फळे, फुले आणि अन्नाचे अवशेष यातून 2047 पर्यंत तब्बल 51 बिलियन डॉलर्सची बाजारपेठ निर्माण होऊ शकते. मंदीच्या काळात जिथे नोकऱ्या कमी होत आहेत, तिथे हे क्षेत्र अर्थव्यवस्थेला नवा आधार देण्याचे काम करेल.

( नक्की वाचा : 8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग आणणार पगारवाढीची लाट, 400 टक्के पगार वाढणार? वाचा सर्व अपडेट )

26 लाख नव्या नोकऱ्यांची मोठी संधी

हा अहवाल केवळ कचरा व्यवस्थापनावर भाष्य करत नाही, तर तो रोजगाराच्या नवीन संधींवर प्रकाश टाकतो. या क्षेत्रात पुढील दोन दशकांत सुमारे 26 लाख थेट नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये तांत्रिक कामांपासून ते लॉजिस्टिक आणि व्यवस्थापनापर्यंत अनेक स्तरांवरील कामांचा समावेश असेल. एका अंदाजानुसार, दररोज 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये 28 ते 31 कर्मचारी लागतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रीन वर्कफोर्स तयार होईल.

Latest and Breaking News on NDTV

प्रदूषणमुक्ती आणि स्वच्छ इंधनाची निर्मिती

भारतात दररोज निर्माण होणाऱ्या 1.71 लाख टन कचऱ्यापैकी अर्धा कचरा हा सेंद्रिय असतो. या कचऱ्यापासून बायो-सीएनजी आणि कंपोस्ट खत तयार करण्याची मोठी क्षमता भारताकडे आहे. सध्या केवळ 61 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होते, उर्वरित कचरा जाळला जातो किंवा नाल्यात फेकला जातो. यामुळे होणारे 10 टक्के प्रदूषण रोखण्यासाठी आणि कचऱ्यातून इंधन निर्मिती करण्यासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

( नक्की वाचा : 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांनो सावधान! नवीन वेतन आयोगाला उशीर झाला तर खिशातून जातील लाखो रुपये )

भविष्यातील नियोजन आणि सरकारी पाठींबा

भारत सरकारने लागू केलेले घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 आणि स्वच्छ भारत मिशन, गोबरधन यांसारख्या 16 सरकारी योजनांमुळे या क्षेत्राला मोठी गती मिळत आहे. कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण केल्यास आणि बायो-मिथेनेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवल्यास, हे क्षेत्र 2047 पर्यंत 62 बिलियन डॉलर्सपर्यंत मजल मारू शकते. त्यामुळे नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हे क्षेत्र भविष्यात एक शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com