जाहिरात

November Bank Holiday: नोव्हेंबर महिन्यातही बँकांना सुट्ट्या! किती दिवस राहणार बंद? पाहा सर्व यादी

November Bank Holidays: सणासुदीचा हंगाम संपला असला तरी नोव्हेंव्बेरमध्ये बँका  ९ ते १० दिवस बंद राहतील. नोव्हेंबरमध्ये काही प्रमुख सण आणि स्थानिक कार्यक्रमांमुळे बँका बंद राहतील.

November Bank Holiday: नोव्हेंबर महिन्यातही बँकांना सुट्ट्या! किती दिवस राहणार बंद? पाहा सर्व यादी

November bank holiday list: नोव्हेंबरचा महिना अगदी जवळ आला आहे. या महिन्यातही बँका काही दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये बँकेत येण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांनी आरबीआयने जाहीर केलेल्या बँक सुट्ट्यांची यादी तपासावी. सणासुदीचा हंगाम संपला असला तरी नोव्हेंव्बेरमध्ये बँका  ९ ते १० दिवस बंद राहतील. नोव्हेंबरमध्ये काही प्रमुख सण आणि स्थानिक कार्यक्रमांमुळे बँका बंद राहतील. त्यामुळे, व्यवहारादरम्यान होणारी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घेणे फायदेशीर आहे. (RBI Bank Holidays For November) 

ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांची मोठी गर्दी होती. त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये देखील गुरु नानक जयंती, दिवाळीचे काही भाग (बलि प्रतिपदा, भाई दूज) आणि छठ पूजा यांसारख्या प्रमुख सणांसोबतच काही स्थानिक आणि धार्मिक उत्सवांमुळे बँका बंद राहतील. नोव्हेंबर महिन्यात खालील प्रमुख तारखांना बँका बंद राहतील. यामध्य राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश आहे. दुसरे आणि चौथे शनिवार आणि रविवारची सुट्टी यात वेगळी असेल.

Apple CEO Salary: ॲपलच्या सीईओंची कमाई किती? एका दिवसाच्या पगारात 4 फॉर्च्युनर.. आकडा एकदा पाहाच

नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी

  • १ नोव्हेंबर – दिवाळी, हरियाणा दिवस, कन्नड राज्योत्सव, कुट
  • 2 नोव्हेंबर – विक्रम संवत नवीन वर्ष, दिवाळी (बळी प्रतिपदा), गोवर्धन पूजा
  • 3 नोव्हेंबर – निंगोल चक्कूबा, दिवाळी (सिक्कीम), भाई दूज
  • ५ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा
  • नोव्हेंबर ७ – छठ पूजा (आसाम, पश्चिम बंगाल), वांगळा उत्सव
  • ८ नोव्हेंबर – छठ पूजा (बिहार), कनकदास जयंती
  • 11 नोव्हेंबर - लहबाब डचेन
  • 12 नोव्हेंबर – इगास बागवाल
  • 15 नोव्हेंबर - गुरु नानक जयंती
  • 20 नोव्हेंबर - गरिया पूजा
  • 23 नोव्हेंबर - संग कुट स्नेम
  • Carbide Gun Threat: काय आहे 'कार्बाइड गन'? ज्यामुळे लहान मुलांचे डोळे होतायेत निकामी

आरबीआयच्या सुट्ट्यांची यादी तपासा...

आरबीआय दरवर्षी आणि दर महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी (Official List) जारी करते. या यादीमध्ये राष्ट्रीय, धार्मिक आणि प्रादेशिक सुट्ट्यांसह प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश असतो. यामुळे ग्राहकांना बँक शाखेत (Bank Branch) जाण्यापूर्वीच कामाचे नियोजन करणे सोपे होते आणि व्यवहारांमध्ये कोणतीही गैरसोय टाळता येते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com