NSE Holidays 2025: दिवाळीत शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? मुहूर्त ट्रेडिंग कधी असेल?

Diwali 2025 NSE Holidays Date: दिवाळीचा आठवडा असल्याने या आठवड्यात शेअर बाजार किती दिवस खुला राहणार याबाबत अद्यापही गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

NSE Holidays 2025: दिवाळीआधी (Diwali 2025) शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. या उत्साहात गुंतवणूकदार शेअर बाजारात आणखी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. मात्र दिवाळीचा आठवडा असल्याने या आठवड्यात शेअर बाजार किती दिवस खुला राहणार याबाबत अद्यापही गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. 

दिवाळीमध्ये शेअर बाजार कधी बंद राहणार?

यंदा 20 ऑक्टोबर दिवाळी असल्याने, सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी असेल की नाही, याबाबत गुंतवणूकदारांना अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या 'ट्रेडिंग हॉलिडेज' नुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, 21 ऑक्टोबर दसरा आणि दिवाळी लक्ष्मीपूजन निमित्त 21, 22 ऑक्टोबरला सुट्टी आहे. 

Diwali Offers : खुशखबर! सर्वांचा फेव्हरेट 'हा' iphone झाला 45 हजारांनी स्वस्त

या वर्षी दिवाळी सोमवार, 20 ऑक्टोबरपासून आहे. मात्र शेअर बाजार 20 ऑक्टोबर रोजी सुरू राहणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने 21 आणि 22 ऑक्टोबर या दोन दिवशी शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. 

मुहूर्त ट्रेडिंग वेळ आणि तारीख

दरम्यान, नेहमीच्या प्रथेनुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणारे 'मुहूर्त ट्रेडिंग' यावर्षी मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे, दुपारी 1.45 ते दुपारी 2.45 या वेळेत हे मुहूर्त ट्रेडिंग पार पडेल.  याआधी संध्याकाळच्या वेळेस मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जात असे. मात्र यंदा वेळेत बदल करण्यात आला असून ते दुपारी होईल.

Advertisement

नक्की वाचा > सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच